कोरोनामुळे शेतीच्या कामाचा खोळंबा कृषीविषयक दुकाने चालू ठेवावी- विजयकांत कुदळे,संस्थापक शेतकरी जागरण मंच

Share:

दिपाली  बोडवे  – apmcnews.com

सोलापूर : शासनाने स्पष्ट आदेश दिला होता की,
लॉकडाऊन काळात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही अशी दक्षता घ्यावी. तरीदेखील कोरोना वाढीमुळे कृषीविषयक दुकाने बंद ठेवली जात आहे.त्यामुळे शेतीच्या कामामध्ये अडथळा येऊ लागला आहे.सध्याच्या काळात दवाखाने , मेडिकल, दूध यांनाच परवानगी आहे.पावसामुळे वाफसा नसल्या कारणाने शेतकऱ्यांना शेतात काम करता येत नाही.पाऊस पडत नसल्या कारणाने जमिनीला वाफसा आला आहे.त्यामुळे मशागतीची कामे, ऊसाची लागवड , पेरणी इ.कामे शेतकरी करत असल्याचं समजलंय.
अगोदरच शेतीवर अनेक संकट आल्या कारणाने शेतीधंदा तोट्यात आला आहे. लॉकडाऊन काळात बियाणे ,औषधे, खते , अवजारे इ.प्रकारचे खाद्य दुकाने बंद असल्यामुळे मिळू शकत नाही,त्यामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा झाल्या कारणाने कृषीविषयक दुकाने चालू ठेवावी असे विजयकांत कुदळे (संस्थापक शेतकरी जागरण मंच )यानी सांगितले.

Share: