अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अवघ्या 48 तासात मोठी गोड बातमी मिळाली आहे.

21
0
Share:

*अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अवघ्या 48 तासात मोठी गोड बातमी मिळाली आहे.*

एका रात्रीत महाविकास आघाडीचा एक डाव विस्कटून भाजपच्या गळाला लागलेल्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अवघ्या 48 तासात मोठी गोड बातमी मिळाली आहे.अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. त्याच्या विरोधातील फाईल बंद करण्यात आली आहे . विशेष म्हणजे याच घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,यांच्या सह राज्यातील भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांविषयी गाडीभर पुरावे असल्याचे आरोप केला होता त्यांना ऑर्थर रोड कारागृहात टाकण्याची भाषाही करण्यात आली होती.मात्र अत्ता त्यांना या साऱ्या आरोपातून क्लीन चिट देण्यात आली आहे .

Share: