अजित पवारांचं ‘ट्विट”; मी राष्ट्रवादीतचं आहे

5
0
Share:

अजित पवारांचं ‘ट्विट”; मी राष्ट्रवादीतचं आहे

मी राष्ट्रवादीतचं आहे आणि नेहमीच राष्ट्रवादीत असेन आणि शरद पवार साहेब आमचे नेते राहतील. आमची भाजपा-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षे महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल जी राज्य व लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली.

अजित पवारांच्या या ट्विटमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात नेमके काय सुरु आहे. हे सामान्य मतदारांच्या समजण्यापलीकडे आहे. एका रात्रीत भाजपाला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अजित पवारांनी राजकीय संकट निर्माण केलं. आता पुन्हा या विषयाला त्यांनी नवीन वळण देण्याचा प्रयन्त केला आहे.

Share: