Alibag Building Collapse | महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, 200 ते 250 लोक अडकल्याची भीती

3
0
Share:

रायगड– रायगडजिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे . या इमारतीत जवळपास 200 ते 250 रहिवासी राहत असल्याची माहिती आहे. महाड शहरातील काजळ पुरा परिसरात ही दुर्घटना घडली.दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे 10 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या 5 मजली इमारतीत साधारण 60 फ्लॅट होते. यात 200 ते 250 लोक राहत होते. सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे. स्थानिकांनी 10-12 लोकांना बाहेर काढलं आहे.

200 ते 250 रहिवासी अडकल्याची भीती

महाड शहरात काजळपुरा परिसरात पाच मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या मलब्याखाली साधारणत: 200 ते 250 रहिवासी अडकल्याची भीती आहे. जेसीबीच्या मदतीने मला हटवण्याचे काम सुरु आहे. बचाव पथक आणि इतर यंत्रणा लवकरच घटनास्थळी पोहोचेल. आतापर्यंत 8 ते 10 लोकांना बाहेर काढलं आहे. ही घटना फार भयावह आहे. या इमारतीत जवळपास 40 ते 60 फ्लॅट्स आहेत. त्यामुळे 200 ते 250 नागरिक अडल्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक लोकांनी दिली.

नेमकं काय घडलं?

महाड शहरातील 5 मजली इमारत कोसळली. ही सुमारे 10 वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीत जवळपास 60 कुटुंब आहेत. यापैकी 200 लोक ढिकाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती गावकरी सुनील ठाकूर यांनी दिली आहे .आतापर्यंत दहा बारा लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. जे लोक जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share: