बेलापूर मतदार संघातील तीनही उमेदवारांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

5
0
Share:

नवी मुंबई: नवी मुंबईकरांची निवडणूकी संबधी उत्सुकता शिगेला पोहोचली असून,आज बेलापूर मतदार संघाच्या तीनही उमेदवारांनी कोकण भवन येथे अर्ज भरले.
आज नवी मुंबईतील कोकण भवन येथे बेलापूर मतदार संघातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. बेलापूर मतदार संघातून भाजपच्या मंदा म्हात्रे, राष्ट्रवादीचे अशोक गावडे, व मनसेचे गजानन काळे हे उमेदवार असून तिघांनीही आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. बेलापूर ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदार संघात भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याने नवी मुंबईतील सैनिक नाराज झाले होते त्याचं याची देही याची डोळा उदाहरणं आज पाहायला मिळाले कारण मंदा म्हात्रे यांच्या सोबत एकही शिवसेनेचा कार्यकर्ता व पदाधिकारी पाहायला मिळाला नाही एकंदरित शिवसेनेची नाराजी आज प्रकर्षाने जाणवली.

नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर नाईक म्हात्रे वादावर पडदा पडल्याचेही पाहायला मिळाले आज मंदा म्हात्रे यांच्या सोबत नाईक गटातील माजी महापौर सागर नाईक आपल्या कार्यरत्यांसह मंदा म्हात्रें यांच्या सोबत उपस्थित होते.गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले ही चर्चा सर्वत्र होती मात्र आज अशोक गावडे यांनी हम भी कुछ कम नही अशी भूमिका घेत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरला..यावेळी कॉग्रेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अनुपस्थित निदर्शनास आली. मनसेचे गजानन काळे यांनीही मनसैनीकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला . बेलापूर मतदार संघातील मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार असून. ही निवडणूक नवी मुंबईतील राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल असं मत सर्वसामान्य नवी मुंबईकर व्यक्त करीत आहेत.

*बेलापूर मतदार संघातील तीनही उमेदवारांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल*

*युतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करून गणेश नाईक यांचा पुतण्या व नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांच्या उपस्थितीत केला उमेदवारी अर्ज दाखल. नाराज शिवसैनिकांची मात्र गैरहजेरी..*

*महाआघाडीच्या अशोक गावडेनी शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज.काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी अनुपस्थित.*

*राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मनसेच्या गजानन काळेंनी भरला उमेदवारी अर्ज*

Share: