मुंबई एपीएमसी मधील अधीक्षक अभियंत्याची मुक्ताफळं, प्रश्नाचे उत्तर तर नाहीच..तुम्ही मोदी मीडिया असे पत्रकारांवर आरोप..

20
0
Share:

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील दाना मार्केटमध्ये रस्त्याचे डांबरीकरण पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे, हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने तसेच भाजी व फळ मार्केटमध्ये फुटपाथवर सुरू असलेल्या अनधिकृतपणे  हॉटेल व्यावसायाविषयी विचारणा करण्यासाठी काही पत्रकार गेले असता संबधित पत्रकाराने प्रश्नांचे उत्तर न देता तुम्ही मोदींची मीडिया आहेत असे बेजबाबदार वक्तव्य केले व संबधीत अधिकारी सरळ निघून गेला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मार्केटमधील काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आली आहे ,वर दर्जाचे पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत, तसेच फळ व भाजी मार्केटमधील फुटपाथवर अनधिकृतपणे हॉटेल चालविण्यात येत आहे ज्यामुळे वाहेरून येणाऱ्या गड्याला बाजार आवारात मोठ्या प्रमाणे त्रास सहन करावा लागत  आहे.तीन दिवसांपूर्वी फळ मार्केट मध्ये फूटपाठवर बसलेल्या एका चाय वालाला  बोलेरो पिकअप यांनी धडक दिल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले होते त्यामध्ये एकाची मृत्यू झाले तर दुसरेला कईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे , यासंदर्भात प्रश्न विचारण्यासाठी काही पत्रकार प्रशासकीय इमारतीमधील अधीक्षक अभियंता विलास विरादार यांना विचारणा केली असता, त्यांनी प्रश्नांची उत्तरं न देता, उलट उद्धट व उर्मटपणे दुरुत्तरे केली व तुम्ही तुमची काम सोडा, अगोदर वाशी खाडी पुलावर जाऊन पहा, नंतर मार्केटविषयी बोला, तसेच तुम्ही सगळे मोदी मीडिया आहात अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्ये विरादार यांनी केलं.


मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीकडून दाना व मसाला मार्केट बाजारामध्ये काँक्रीटकरण, डांबरीकरण आणि गटाराच्या कामासाठी मंजुरी मिळाली आहे. दाना मार्केट येथील व्यापारी भवन विभागातील काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर चक्क डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच फुटपाथवर पेवरब्लॉकचे काम सुरू आहे. संबधित निकृष्ट दर्जाची असून, टेंडर मध्ये जे आहे. त्याप्रमाणे काम होत नसल्याची प्रतिक्रिया दाना मार्केटमधील व्यापारी वर्गाने दिली आहे .बाजारसमितीचे अधीक्षक अभियंता व मार्केट अभियंता याकडे डोळेझाक करत आहेत त्यामुळे रस्त्याची उंची वाढली असून कामगारांना मालाची चढ-उतार करताना त्रास होत आहे .टक्केवारीसाठी याप्रकारे अजब कारभार सुरू असून या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काही व्यापारीवर्गाने केला आहे. तसेच कामाच्या दर्जाविषयीही प्रश्न उपस्थित केला जात आहे.काही सामाजिक कार्यकर्ते सीबीआय कडे तक्रार करणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.


मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती येथील दाना मार्केट व मसाला मार्केटमध्ये काँक्रीट,डांबरीकरण व गटाराच्या कामासाठी बाजारसमितीकडून मंजुरी मिळाली आहे.याकामासाठी सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.दोन्ही मार्केटच्या डांबरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम बी.जे सिव्हिल वर्क या कंत्राटदाराला देण्यात आले होते.दाना मार्केट व मसाला मार्केट येथे अवजड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते,त्यामुळे डांबरीकरण केलेले रस्ते लवकर खराब होण्याची शक्यता आहे.याशिवाय येथील गटारांची अवस्थाही वाईट आहे म्हणून व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन या कामाची मागणी केली होती.मात्र प्रस्तावित ठिकाणी काम केले जात नसून, व्यापारी भवन येथील चार वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावरच डांबरीकरण केले जात आहे व हे डांबरीकरण खोदकाम न करता केले जात असल्याने, या डांबरीकरणामूळे रस्त्यांची उंची वाढली असून, माथाडी कामगारांना मालाची चढ-उतार करताना त्रास होत आहे. तसेच ड्रेनेजचे काम हे योग्य पद्धतीने केले नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या डांबरीकरण सुरू असलेल्या डांबराची जाडी देखील कमी आहे.हे काम पूर्ण होण्यासाठी फक्त तीन महिने बाकी असूनही फक्त ३०% काम पूर्ण झाले आहे. तसेच इतर प्राथमिक सुविधांचे काम बाकी असून त्याकडे दुर्लक्ष करून हे डांबरीकरण काम सुरू केले असल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने दिली आहे.

Share: