Anant Chaturdashi 2019 | गणपती विसर्जनानिमित्त मुंबईतील कोणकोणत्या मार्गांमध्ये बदल

6
0
Share:

मुंबई:अनंतचतुर्दशीनिमित्त लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर राज्यभरातील विविध समुद्र किनारे, नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ उसळणार आहे. गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा केल्यानंतर गणेशभक्त साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप देतील. मुंबईतील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भक्तांचा जनसागर उसळतो. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत किंवा बंद ठेवण्यात आले आहेत. शहरातील 53 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 56 मार्गांवर एकेरी वाहतूक सुरु राहील, तर 99 रस्त्यांवर गाडी पार्क करण्याची परवानगी नसेल.

वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले रस्ते

भायखळा विभाग-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड
डॉ. एस. एस. रोड
दत्ताराम लाड मार्ग
साने गुरुजी मार्ग

भोईवाडा वाहतूक विभाग-

डॉ. ई. बोर्जेस मार्ग
जेरबाई वाडिया मार्ग

एकेरी वाहतूक असणारे रस्ते

नागपाडा वाहतूक विभाग-

मुंबई सेंट्रल ब्रिज
बेलासिस ब्रिज
डॉ. भडकमकर मार्ग
साने गुरुजी मार्ग
चिंचपोकळी ब्रिज

भोईवाडा वाहतूक विभाग –

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग
ग. द. आंबेकर मार्ग
आचार्य दोंदे मार्ग
महादेव पालव मार्ग

वरळी वाहतूक विभाग-

डॉ. अॅनी बेझंट मार्ग
ना. म. जोशी मार्ग

पूर्व उपनगरे विभाग-

वाहतुकीसाठी बंद रस्ते

दादर वाहतूक विभाग-

रानडे मार्ग
शिवाजी पार्क पथ क्रमांक 3
शिवाजी पार्क पथ क्रमांक 4
केळुसकर मार्ग
केळुसकर मार्ग दक्षिण
केळुसकर मार्ग उत्तर
एन. सी. केळकर मार्ग
एम. बी. राऊत मार्ग

माटुंगा विभाग-

टिळक ब्रिज

चेंबुर विभाग-

हेमू कॉलनी मार्ग
गिडवाणी मार्ग

ट्रॉम्बे वाहतूक विभाग-

घाटला गाव

घाटकोपर विभाग-

लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला पूर्व

मुलुंड वाहतूक विभाग-

भट्टीपाडा मार्ग, भांडुप पश्चिम
जंगल मंगल मार्ग, भांडुप पश्चिम
पंडित दिनदयाल उपाध्याय मार्ग
सर्वोदय नगर

मुंबईत आज पाच हजार 630 (5,630) सार्वजनिक गणेश मूर्ती, तर 31 हजार 72 (31,072) घरगुती गणपतींचं विसर्जन होईल, असा अंदाज आहे. शहरातील एकूण 129 जागांवर विसर्जनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये गिरगाव, दादर, माहिम, जुहू, मार्वे यासारख्या समुद्र चौपाटी, विविध तलाव आणि कृत्रिम तलावांचा समावेश आहे.

अनंतचतुर्दशीनिमित्त गुरुवारी गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. जवळपास 40 हजार पोलिसांचा फौजफाटा शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय SRPF, QRT, FORCE ONE, RAF आणि होमगार्डही तैनात आहेत.

पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरांची गणेश भक्तांच्या गर्दीवर निगराणी असेल. तीन ड्रोन कॅमेरांचाही यावेळी वापर केला जाणार आहे.

गणपती विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर लाईफगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे समुद्रात बोटीच्या माध्यमातूनही गस्त घालण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेची वैद्यकीय कॅम्प आणि अग्निशमन दलही तैनात करण्यात आले आहेत.

 

Share: