मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 3 वर, फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास

6
0
Share:

फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास

-कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या व्यक्तीने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत
Philippines Corona Patient Dies) असून मुख्यमंत्र्यांच्या भाषेत तो गुणाकार करताना दिसत आहे. कारण मुंबईत कोरोनाबाधिताचा तिसरा बळी गेला आहे. मूळचा फिलिपिन्सचा असलेल्या नागरिकाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाल्याने आता देशातील मृतांचा आकडा आता 7 वर येऊन पोहोचला (Philippines Corona Patient Dies) आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही 59 वर्षीय फिलिपाईन्सची नागरिक असल्याची माहिती आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या व्यक्तीने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केल्याचं समोर आलं आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला.ही व्यक्ती एका धार्मिक कार्यक्रमासाठी फिलिपाईन्सहून 10 जणांच्या गटासह मुंबईत आली होती. ते सर्वात अगोदर मुंबईत आले. त्यानंतर ते नवी मुंबईत गेले आणि धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईतून दिल्लीला गेले. विशेष म्हणजे त्यानंतर ते दिल्लीतून पुन्हा मुंबईत आले आणि नवी मुंबईतील वाशी येथे गेले.

तिथे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना वाशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना उपचारासाठी थेट कस्तुरबा रुग्णालयात हलवलं. कस्तुरबा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं.

फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास

3 मार्च – फिलिपीन्समधून या बाधितासह एकूण 10 जणांना गट मुंबईत आला. या सर्वांची राहण्याची व्यवस्था वाशीतील नूर मशिदीत करण्यात आली.
5 मार्च – फिलिपीन्समधून आलेला हा गट वाशीतून मुंबई सेंट्रल स्थानक आणि तिथून रेल्वेमार्गे दिल्लीला गेला.
6 मार्च – दिल्लीतील एका मशिदीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली
7 ते 9 मार्च – दिल्लीतील मशिदीत धार्मिक कार्यक्रमात हा गट सहभागी झाला
10 मार्च – रेल्वे मार्ग हा गट दिल्लीतून मुंबईला परतला आणि पुन्हा वाशीच्या मशिदीत मुक्कामाला पोहोचला
10 मार्च – या 10 जणांच्या गटातील 59 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्यानं डॉक्टरकडे नेण्यात आलं, तपासणीनंतर डॉक्टरांना त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवले
12 मार्च – तपासणी अहवालात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं
13 मार्च – वाशी आणि दिल्लीतील या गटानं वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या
14 मार्च – या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं
17 मार्च – 59 वर्षीय बाधिताची प्रकृती खालावली असून, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं
24 तासात कोरोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये 15 नव्या रुग्णांची वाढ

त्यासोबतच कोरोनाच्या गेल्या 24 तासात कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत 14, तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 74 वरुन 89 वर पोहोचला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
मुंबई – 59 वर्षीय फिलिपाईन्सची नागरिकाचा मृत्यू (1) – 23 मार्च
एकूण – 7 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Share: