नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरचं दाखल होणार ऍन्टी ड्रोन यंत्रणा.

6
0
Share:

-नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरचं दाखल होणार ऍन्टी ड्रोन यंत्रणा.

नवी मुंबई पोलीसांच्या ताफ्यात ऍन्टी ड्रोन यंत्रणा लवकर दाखल होणार असून ही यंत्रणा सिंगापूरी असून त्याद्वारे उडत्या ड्रोन वर नियंत्रण मिळवणे नवी मुंबई पोलिसांना सहज शक्य होणार आहे.येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस मैदानात ऍन्टी ड्रोन यंत्रणे संबधी एक सराव चाचणी ठेवली होती, ही यंत्रणा येत्या निवडणूकित वापरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ड्रोनची सिग्नल यंत्रणा 2.5 आणि 5.5 गेगाहर्ट्स या सिग्नल फ्रिक्वेन्सी वर चालते एक किलोमीटर पर्यंत कोणत्याही संशयित ड्रोनवर नियंत्रण करून मैदानात उतरवून परत पाठवून देऊ शकतो,तसेच त्याला कमान देऊन सुरक्षित ठिकाणी उतरू शकतो.अशी या यंत्रणेची खासियत आहे.

सध्या जगात ड्रोन हल्ले होत आहेत. नवी मुंबईत जेएनपीटी, ओएनजीसी, पेट्रोकेमिकल कंपन्या ,कस्टम वंडेड वेयर हाउस व इतर महत्वाची ठिकाण आहेत. यामुळे नवी मुंबई शहरावर वाईट वृत्तीच्या लोकांनी ड्रोन हल्ला करू नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, विशेष शाखाचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे,पोलीस उपायुक्त क्राइम प्रवीण पाटील,पंकज दाहणे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .

यावेळी ऍन्टी ड्रोन गन कशाप्रकारे वापरण्यात येईल हे दाखवण्यात आले.पोलीस यंत्रणेच्या बरोबरीने जेएनपीटी, ओएनजीसी, पेट्रोकेमिकल कंपन्यांचे ५०पेक्षा अधिक अधिकारी उपस्थित होते. इंटी ड्रोनच्या साहाय्याने घातपाती कारवाया,संशयास्पद चित्रीकरण रोखता येणार आहे .नवी मुंबई पोलिसांना ही यंत्रणा कसे काम करेल त्याचे योग्य प्रशिक्षण बेलापूर पोलीस आयुक्त मुख्यालयात देण्यात आले.

Share: