BREAKING: मुंबई Apmc मार्केटमध्ये करोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी प्रत्येक बाजारात अँटिजेंन आणि आर टी पी सी आर चाचणी केंद्र सुरू होणार-अभिजित बांगर

7
0
Share:

नवी मुंबई : वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात आत्ता काही प्रमाणात किरकोळ विक्री ही सुरू करण्यात आली आहे .त्यामुळे घाऊक बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढू लागली आहे. या वाढत्या गर्दी बरोबर येणाऱ्या दुसऱ्या करोना लाटेचे संकट लक्षात घेता चार ही बाजारात करोना चाचणी केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्यासाठीच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.


बाजार समिती मध्ये आत्ता एक करोना चाचणी केंद्र सुरू आहे. मात्र बाजारात वाढणारी गर्दी लक्षात घेता आत्ता बाजाराकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. बाजार समिती मधून येणाऱ्या जाणाऱ्या खरेदीदार विक्रेते आणि इतर घटकांच्या माध्यमातून करोना विषाणू चा प्रादुर्भाव अधिक वाढन्याची शक्यता आहे. कारण बाजार समिती मधून येणारा जाणारा घटकांचा संबंध थेट शहरातील व्यक्तींची येत आहे. त्यामुळे इथूनच हा करोना विषाणू चा प्रसार थांबवण्यासाठी प्रत्येक बाजारात अँटिजेंन आणि आर टी पी सी आर चाचणी केंद्र सुरू केले जाणार असल्याचे माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे . यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्या नुसार प्रत्येकावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सध्या बाजारात बाजाराच्या प्रत्येक गाळ्या बरोबर मोकळ्या असलेल्या पेसेज मध्ये ही भाजीपाला विक्री होत आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारात गर्दी अधिक होत आहे. त्यामुळे या बाजारात अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

Share: