Apmc Corona Test : मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये  रात्रीच्या वेळी अँटीजन टेस्ट सुरु

5
0
Share:
नवी मुंबई:  ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेत कोरोनाची साखळी खंडीत करणे आणि मृत्यूदर कमी करणे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात असताना कोरोनाबाधित रूग्णांना योग्य प्रकारे व योग्य दरांमध्ये वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांनी मोहीम हाती घेतली असून आता ” मिशन एपीएमसी” सुरू करण्यात आली आहे.(Antigen test started at night in Mumbai APMC vegetable market)
आशियाखंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या एपीएमसी मार्केटमध्ये दर दिवसात हजारोंच्या संख्येने ग्राहक ,माथाडी कामगार, व्यापारी यांची सतत ये-जा सूरु असते.या एपीमसी मार्केटमुळे संपूर्ण नवी मुंबई मध्ये कोरो संसर्ग पसरल्या होता ,कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन एपीएमसी’ ही मोहिम हाती घेतली. या मोहिमेला नागरिकांचा ही चांगला प्रतिसाद मिळतोय.
भाजीपाला मार्केट रात्री चालू होतो आणि सकाळी 7 पर्यत संपतो.दरम्यान,महापालिकेच्या वतीने काल रात्री 10 पासून सकाळी सात पर्यन्त भाजीपाला  मार्केटमध्ये अँटीजन टेस्ट सुरू करण्यात आली.मार्केटमध्ये एन्ट्री मारायच्या आधी ही टेस्ट प्रत्येक व्यक्तीची करून घेतली जात आहे. ही टेस्ट पार पद्माकरिता याच्या मागे महापलिकाची  मोठी टीमची निवड केली गेली आहे.टीममध्ये 20 डॉकटर,तुर्भे विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच एपीएमसीचे कर्मचारी ,सुरक्षा कर्मी आहेत, काल रात्री 500 व्यक्तीची टेस्ट करण्यात आली असून,साधारणपणे बाजारात रात्री 9 पासून सकाळी 7 पर्यंत 10 ते 15 हजार लोक ये जा करतात  लवकरच टेस्टिंगचा आखडा वाढला जाईल त्यामुळे कोरोनाचा आखडा आटोक्यात येईल,असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.(Antigen test started at night in Mumbai APMC vegetable market)
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या 19 हजार पार झाली असून मंगळवारी 278 नवे करोनाबधित रुग्ण आढळले आहे. याचसोबत शहरातील मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य विभागापुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या 19,033 झाली आहे. शहरात मंगळवारी 7 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या 478 झाली आहे. आतापर्यत एकूण 15,275 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शहरात 4,125 रुग्णांवर उपचार सुरू आहेत असून शहरात आतापर्यंत 38 हजार 100 प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला तीन हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. करोनामुक्तीचा दर 80 टक्केपर्यंत पोहोचला आहे.  नवी मुंबईत एकूण 75,875 नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.(Antigen test started at night in Mumbai APMC vegetable market)
Share: