APMC मार्केटमध्ये उद्या पासून अँटिझन टेस्ट सुरू होणार ,महापालिका आयुक्त अभिजीत बांगर

5
0
Share:

नवी मुंबई : मुंबई एपीएमसीत पाचही मार्केटमध्ये उद्या पासून अँटिझन टेस्ट सुरू होणार अशे निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोक दरदिवशी घराबाहेर पडतात त्यामुळे एपीएमसी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्याचप्रमाणे एपीमसी मध्ये जवळपास 800 कोरोना रुग्णची संख्या असताना पाचही मार्केटमध्ये जवळपास 40 जणांचा मृत्यू झाला आहे . एपीमसी मुळे पूर्ण शहरात कोरोना संसर्ग पसरतो त्यामुळे नवी मुंबई नागरिकांनी आवाज उठवले होते ज्यामुळे एपीमसी पाचही मार्केट 7 दिवस बंद ठेवण्यात आला होता ,कोकण आयुक्तांनी काही अटी शर्त लावली आणि एपीमसी परत सुरू झाला आता एपीमसी मार्केट मधून कोरोनाचे रुग्ण आढळले आहे
त्याच अनुशंगाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी उद्या 27 जुलै पासून एपीएमसी पाचही मार्केटमध्ये अँटिझन टेस्ट सुरू करणार आहे.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी ‘मिशन ब्रेक द चैन’ ही उपाययोजना हाती घेतली आहे.कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी तपासणी अधिक व्हावी यासाठी खुप पटीने वेगवेगळ्या उपयोजना राबवल्या.आणि तातडीने पावलं घेत अर्ध्या तासात तपासणी होणाऱ्या अँटीजन टेस्ट करण्यास सुरुवात केली.
कोरोना पॉझिटिव्ह आणि त्यांना संपर्कात असणाऱ्या व्यक्तीची अँटीजन टेस्ट करण्यात यावी असे बैठकीत सूचित केले. वाशीमधील सेक्टर 10 ए येथे 16 जुलै रोजी महानगरपालिकेच्या सार्वजनिक डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयात रँपीड अँटीजन टेस्ट केंद्र सुरू केले.अँटीजन टेस्ट केंद्र वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत.16 केंद्रामध्ये अँटीजन टेस्ट करण्यात आली. केवळ 10 दिवसात 6144 जणांची टेस्ट करण्यात आली.त्यातील 919 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले.
या परिस्थितीत महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली, बेलापूर, तुर्भे ,कोपरखैरणे रुग्णालयात अँटीजन टेस्ट सेंटर सुरू केले. पोलीसांची देखील ही टेस्ट करण्यात आली आहे,जवळ जवळ 1852 पोलिसांची टेस्ट करण्यात आली. या उपाययोजनेसाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Share: