एपीएमसीची दोन कंटेनरवर कारवाई, 22 हजार 440 किलो  लौंगची माहिती लपविली,4 लाख 34 हजार रुपये दंड आकारला

4
0
Share:

-एपीएमसीला माहिती न देता आयात केलेली दोन कंटेनर लौंग गोडाऊन मध्ये खाली करताना दक्षता पथकाने कारवाई करून 4 लाख 34 हजार रुपये दंड आकारला आहे

नवी मुंबई:एपीएमसीला माहिती न देता शेतमाल अनधिकृतपणे परस्पर गोडाऊन मध्ये खाली करताना दोन कंटेनर मध्ये असलेल्या 22 हजार 440 किलो लौंग दक्षता पथकाने कारवाई करून 4 लाख 34 हजार रुपये दंड आकारला आहे.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रामध्ये विनापरवाना होणाऱ्या व्यापाऱ्यावर दक्षता पथकाने कारवाई सुरू केली आहे .नियमानुसार आयात होणाऱ्या कृषी मालाची माहिती बाजार समितीला देने संबंधित व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे.परंतु काही व्यापारी माहिती न देता परस्पर एमआयडीसीमधील गोडाऊन मध्ये मालाची साठवणूक करतात.बाजारसमितीचे सचिव अनिल चव्हाण व विशेष कार्य अधिकारी बी.डी. कामिठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनाथ वाघ ,हिंदुराव आळवेकर व एस. बी.वाघ याच्या पथकाने पावणे एमआयडीसीमध्ये कारवाई केली.
तपासणी केला असताना दोन कंटेनर मध्ये 440 गोण्या लौंग असल्याचे निदर्शनास आले.२२,४४० किलो लौंग ह्या कंटेनर मध्ये होता त्याची बाजार भाव 1 कोटी २० लाख ७५० रुपयांची आहे.हे लौंग पावणे एमआयडीसी मध्ये असलेल्या एग्रो कोल्डस्टोरेज येथून जब्त करण्यात आली आहे राजस्थानच्या महालक्ष्मी प्रोटीन प्राइवेट लिमिटेड या कंपनी येथून दोन कंटेनर मध्ये आलेली ही लौंग अवैध रित्यानी आणली गेली होती.
बाजार समितीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली आहे।

Share: