Apmc Corona:नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 1128 तर Apmc मध्ये कोरोना रुग्णाची संख्या 372.

4
0
Share:

*नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 1128 तर एपीएमसी मध्ये कोरोना रुग्णाची संख्या 372.

नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असून शनिवारी ८० नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ११२८ झाली आहे. आज तब्बल ९५ रुग्ण बरे होऊन गेले तर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३६७ एवढी झाली आहे. दुसरीकडे एपीएमसी मार्केट मध्ये व्यापार करणाऱ्या व्यापारी व त्याच्या संपर्कात आलेले 372 जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे नवी मुंबईकराची चिंते वाढले आहेत.
नवी मुंबईत आज वाढलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ६,नेरुळ १२’ वाशी ९, तुर्भे २५, कोपरखैरणे १५, घणसोली ७, तर ऐरोली येथील ६ जणांचा समावेश आहे.

Share: