Apmc coronavirus : व्यापाऱ्यामुळे कोरोनाची रुग्ण वाढतो!, प्रशासनाने आता पर्यंत केलेल्या उपायोजना फेल.

7
0
Share:
व्यापाऱ्यामुळे कोरोनाची रुग्ण वाढतो,आता पर्यंत केलेल्या उपायोजना फेल
-व्यपाऱ्याकडून जास्तमाल मागवून व्यापार केल्याने सोशल डिस्टनसिंगची ऐशी तैशी झाली, त्यामुळे मार्केट मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले,
-मार्केटमध्ये निर्जंतुकीकरण, फवारणी,साफसफाई,थर्मल स्क्रिनिंग,निर्जंतुकीकरण टनल असे विविध उपायोजना दीड महिन्यापासून  होत असताना कोरोनाचे रुग्ण का वाढले?
नवी मुंबई:नवी मुंबईत एपीएमसीमुळे करोनाबाधितांची वाढती संख्या नियंत्रणात आणणे महापालिका प्रशासनासाठी आव्हानात्मक बाब ठरली आहे. शुक्रवारी नवी मुंबईत आणखी 74 करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने बाधितांची एकूण संख्या 1048 वर पोहोचली तर 23 कोरोनाबधित रुग्णाची मृत्यू झाली आहे. अद्याप 948 नागरिकांचा अहवाल प्रलंबित असून 272 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. नवी मुंबईत शुक्रवारी आढळून आलेल्या 74 रुग्णांमध्ये बेलापूरमधील 2, नेरूळमधील 18, वाशीतील 4, तुर्भेतील 14, कोपरखैरणेतील 19 , घणसोलीतील 13, ऐरोली येथील 2, दिघा येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.
नवी मुंबई मध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे संसर्ग झपाट्याने वाढत असताना  एपीएमसी मुळे कोरोना रुग्णाची संख्या 370 पर्यंत  पोहचले आहेत तर 2 व्यापाऱ्याच्या मृत्यू झाली आहे यामध्ये असे दिसून येत आहे की काही व्यपाऱ्या मुळे बाजार आवारात कोरोनाचे संसर्ग वाढले आहे त्यामुळे प्रशासनातर्फे दीड महिन्यापासून करण्यात आलेल्या उपायोजना फेल झाली आहे.
एपीएमसी प्रशासनाने सात दिवस मार्केट बंद ठेवून मार्केट मध्ये निर्जंतुकीकरण व साफसफाई, मार्केट मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्क्रीनिग टेस्ट, मार्केट मध्ये व्यपार करणाऱ्या व्यपाऱ्याला  आईडी कार्ड देण्यात येत आहे यामध्ये  ज्याची टेस्ट झाली त्यालाही आत प्रवेश देण्यात येईल असे एपीएमसी प्रशासनाने निर्णय घेतले आहे तसेच एपीएमसी मार्केटच्या सर्व व्यवहार ऑनलाइन करा ज्यामुळे मार्केट मध्ये गर्दी होणार नाही व कोरोनाचे संसर्ग काही प्रमाणे थांबू शकतो असे आदेश  महापालिका आयुक्त आणासाहेब मिसाळ यांनी एपीएमसी प्रशासनाला दिली आहे .
एपीएमसीच्या पाचही मार्केट कंटेन्मेंट जोन घोषित.
एपीएमसी मार्केटच्या फळ,भाजीपाला, धान्य,मसाला व कांदा बटाटा मार्केट महापालिका तर्फे कंटेन्मेंट जोन घोषित करण्यात आली आहे ,पाचही मार्केट मध्ये कोरोनाचे पोजिटीव्ही रुग्ण सापडल्याने महापालिका तर्फे कंटेन्मेंट जोन घोषित करण्यात आली आहे ,शुक्रवारी महापालिकांच्या अहवालात आता पर्यंत एपीएमसी मुळे 370 कोरोना रुग्ण मिळाली आहे त्यामध्ये दोन व्यापाऱ्याच्या मृत्यू झाली आहे.महापालिका तर्फे पाचही मार्केटच्या गेटवर कंटेन्मेंट जोनच्या फळक लावण्यात आली आहे.
जोपर्यंत नवी मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या  आटोक्यात येत नाही तो पर्यंत मार्केट बंद करा
नवी मुंबईत मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व एपीएमसी मध्ये कार्यरत व्यक्ती यांच्यामुळे नवी मुंबई कोरोनाचे संक्रमण वाढले आहे त्यामुळे जोपर्यंत नवी मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या  आटोक्यात येत नाही तोपर्यंत एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात यावी अशी मागणी आमदार गणेश नाईक सोवत नवी मुंबईच्या नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
 मुंबई एपीएमसी मध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.आतापर्यंत व्यापारी, माथाडी, मापाडी, कार्यालयीन कर्मचारी,सुरक्षा रक्षक, ग्राहक दलाल व त्यांचे निकटवर्तीय यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे मुंबईत कामासाठी जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत व्यक्तींची सोय कामाच्या ठिकाणी करण्यात व  नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित व्हावी ही मागणी जोर धरू लागली आहे.त्या अनुषंगाने एपीएमसीमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार पाहता 11 मे ते 17 मे यादरम्यान एपीएमसी मधील पाचही मार्केट बंद ठेवून मार्केट परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे,त्यानंतर सात दिवस झाल्यावर पुन्हा मार्केट सुरू करण्यात येणार आहे. मात्र जोपर्यंत नवी मुंबईतील कोरोना बाधीतांची संख्या जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात यावे अशी मागणी ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक ,मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांनी कोकण आयुक्तना  केली आहे.
Share: