Apmc Coronavirus News: नवी मुंबईमध्ये एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू , रुग्णची संख्या 1364

19
0
Share:

 

नवी मुंबई-नवी मुंबई मध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे.दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे.बुधवारी एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये एपीएमसी मध्ये काम करणाऱ्या 3 कामगार आहे.

एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला असून कोरोना बळीची संख्या 45 झाली आहे.मृतांमध्ये एपीएमसी संबंधित तीन कामगारांचा समावेश आहे.
बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केट,फळ मार्केट व दाना मार्केटमधील काम करणाऱ्या तिघे कामगारांच्या मृत्यू झाला आहे .आता पर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक 12 जण तुर्भे -सानपाडा परिसरातील आहेत.मृत्यूचा वाढता आकडा चिंतेची बाब झाली आहे.
नवी मुंबईमध्ये 43 नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 1364 झाली आहे.सर्वाधिक 505 रुग्ण एपीएमसी संबंधित आहे .बुधवारी 43 रुग्ण मध्ये एपीएमसी सम्बधित 9 रुग्ण आहे या मध्ये 2 व्यपारी,5 कामगार ,एक सुरक्षा अधिकारी व एक सुरक्षा कर्मचारी आहे .दिवसभरात 22 रुग्ण कोरोणामुक झाले असून एकूण कोरोनामुक्त झाल्याची संख्या 532 झाली आहे.नवी मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे.प्रशासन तर्फे लोकांना गर्दी न करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

Share: