Apmc Market open: एपीएमसी मार्केट सोमावर पासून दोन टप्यात सुरू

22
0
Share:
नवी मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  खबरदारी म्हणऊन नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्यात आले होते. गेल्या 11 मे पासून बंद असलेलं एपीएमसीतील पाचही मार्केट सुरू करण्यासाठी आज कोकण आयुक्त व पाचही बाजारपेठांचे संचालक व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून सोमवारपासून  APMC मध्ये आता थोडे दिवस पहिल्या टप्प्यात भाजी मार्केट धान्य बाजर मसाला बाजार सुरू होणार व दुसऱ्या टप्प्यात फळ व कांदा बटाटा मार्केट चालू होणार आहे .दोन टपायत सुरू होणार पहल्या  सोमवार पासून सुरु होणार आहे. बाजारात सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने हे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
एपीएमसीतील बाजारात होणारी गर्दीमुळे वारंवार मार्केट बंद करण्यात येत आहे सध्या एपीएमसी मध्ये व्यापार करणाऱ्या व त्याची लागण असलेल्या 370 जणांना कोरोनाचे लागण झाली आहे आता मार्केट मध्ये विविध प्रकारच्या उपायोजना करण्यात आली असून मार्केट सुरू करण्यात येत आहे अशी माहिती कोकण आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. आज एपीएमसी प्रशासकीय इमारती मध्ये कोकण आयुक्त शिवाजी दौंडच्या अध्यक्षतेखाली  मुंबई एपीएमसी प्रशासक अनिल चव्हाण,माथाडी नेता नरेंद्र पाटील,शशिकांत शिंदे ,व्यपारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या वैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी काही निर्बंध लावण्यात आले आहेत. बाजार आवारात 200 ते 250 गाड्यांचीच आवक होणार. बाजार आवारात पूर्णपणे सोशल डिस्टनसिंग मेंटेन न झाल्यास बाजार पुन्हा बंद करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे.तर, शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजार आवारात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येईल. बाजार आवारात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व लोकल गाड्या बाजारातून वाहेर काढण्यात येणार आहेत. बाजार आवारात येणाऱ्या ग्राहकांसाठी 15 हजार रुपये किमतीची फळं खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येईल.
मुंबई एपीएमसी आवारातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खालील उपायोजना
मुंबई एपीएमसीत पाचही मार्केट 11 ते 17 मे पर्यन्त बंद ठेवण्यात आली 
-पाचही बाजार आवारातील जिल्हा उप निबंधक यांच्या नियंत्रणाखाली महापालिका व एपीएमसीच्या संयुक्तने निर्जंतुकीकरण करण्यात आली
-बाजार आवारातील सहा हजार घटकांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली,यापुढे असे ठेवण्यात येणार आहे.
-बाजार आवारातील गर्दी कमी करण्यासाठी व्यपाऱ्याना जास्तीत जास्त व्यापार ऑनलाईन व टेलिफोन बुकिंग करण्यासाठी प्रयत्न.
-पाचही बाजार आवारात रोजच्या रोज वाहनांची व गळ्याची निर्जंतुकीकरण करण्यात येईल.
-बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक घटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल व संशयीत रुग्णांना बाजारात प्रवेश नाकारला जाईल व  त्यांना वैद्यकीय सहाय्य करण्यात येईल
-वैद्यकीय तपासणीसाठी बाजार आवाराच्या प्रवेश द्वारावर स्वतंत्र वैद्यकीय पथक ठेवण्यात येईल.
-ज्या व्यक्तीला मास्क नसेल त्या व्यक्तिस बाजार समितीतर्फे मास्क देण्यात येईल.
-थर्मल गनद्वारे तपासणी,येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात सॅनिटायझर टाकण्यात येईल
-मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पल्स ऑक्सिमिटर द्वारे त्याचा रक्ताचा ऑक्सिजन तपासणी करण्यात येईल.
-बाजार आवारात प्रवेश केल्यानंतर सॅनिटायझर स्टँड मोठ्या प्रमाणत उपलब्ध करण्यात येईल।
Share: