Apmc News:बाजार समिती अधिकाऱ्यांचे नातेवाईक आणि राजकीय दबावाखाली  पदे भरण्यात आली ,अतिरिक्त पद भरती रद्द करा  अन्यथा न्यायालयात जाऊ

51
0
Share:

-बाजार समिती अधिकाऱ्यांचे नातेवाईक आणि राजकीय दबावाखाली  पदे भरण्यात आली ,अतिरिक्त पद भरती रद्द करा  अन्यथा न्यायालयात जाऊ

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आलेल्या इ नाम आणि इतर विविध प्रकारची पद भरती रद्द करण्याची मागणी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने बाजार समिती आणि पणन संचालक यांच्याकडे करण्यात आली आहे। या भरतीमुळे बाजार समितीवर आर्थिक ताण वाढत आहे ।शिवाय या भरतीचा बाजार समितीच्या कामात काहीच उपयोग होत नसल्याचा आरोप ही करण्यात आला आहे।

बाजार समितीच्या नियमनातुन शेतमाल कमी केल्याने आत्ता बाजार समिती ला फारसे काही काम राहिले नाहीय। मालाच्या गाड्या बाजारात न येता थेट किरकोळ बाजारात जात आहेत। त्यामुळे बाजार समितीचे उत्त्पन्न ही कमी झाले आहे। यासाठी बाजार समिती प्रशासनाने 2020 पर्यंत ची स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली आहे। एकंदरीत आस्थापनेवरील कर्मचारी अधिकारी वर्ग ही कार्यरत असल्याने अतिरिक्त कर्मचारी अधिकारी वर्गाची गरज नाहीय।
असे असताना इ नाम ही प्रक्रिया राबवण्यासाठी बाजार समितीने
इ लिलाव गृह अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे। त्यासाठी कर्मचारी कंत्राटी पद्धतीने  भरती करण्यात आले आहेत । या इ लिलाव ग्रहाचा बाजार समितीला काहीच फायदा झालेला नाहीय या दोन्ही वास्तू धूळ खात पडून आहेत। इथे आत्ता पर्यंत एक ही इ लिलावपद्धतीने व्यापार झालेला नाहीय।
त्यामुळे इथे नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर खर्च ही पाण्यात आहे।
शिवाय सध्या बाजार समितीचे कामकाज पाहता बाजार समितीच्या आस्थापने वरील कर्मचाऱ्यांची संख्या मुबलक आहे त्यांनाच इ नाम चे प्रशिक्षण देऊन त्यांचीच  नियुक्ती सादर ठिकाणी केली असती तर बाजार समितीचे आर्थिक नुकसानही झाले नसते असे मत कामगार सेनेने व्यक्त केले आहे।
नियुक्त केलेले कर्मचारी बाजार समिती अधिकाऱ्यांचे नातेवाईक आणि ओळखीचे आहेत राजकीय दबावाखाली ही पदे भरण्यात आली असलयाने तात्काळ ती रद्द करावीत आणि बाजार समिती वरील आर्थिक भार कमी करावा अन्यथा न्यायालयात जाऊन या विषयी दाद मागावी लागेल असा इशारा ही रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने अध्यक्ष शिंगरे यांच्या वतीने देण्यात आला आहे।
Share: