Apmc News: पुण्यात शिवसेनेचा दि ओरिएंटल इन्शुरन्सवर धडक मोर्चा, दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला 209 कोटी रुपयांचा लाभ

49
0
Share:

 

पुण्यात शिवसेनेचा दि ओरिएंटल इन्शुरन्स आज धडक मोर्चा

शिवसेनेमुळे दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला 209 कोटी रुपयांचा लाभ*

पुणे :  शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालीच पाहिजे. या मागणीसाठी शिवसेनेने पुणे-मुंबईतील विमा कंपन्यांची दुकाने बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर पुण्यातील दि ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनीने त्यांच्याकडे थकित असलेल्या दोन लाख शेतकऱ्यांना 209 कोटी रुपयांची विमाभरपाई दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून उर्वरित क्लेम मंजूर होताच पिक विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देऊ अशी हमी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पिक विमा प्रश्नी विमा कंपन्यांच्या मुख्यालय वर पंधरा दिवसापूर्वी इशारा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आज शिवाजीनगर मधील दि ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनीच्या मुख्यालयावर शिवसेनेने मोर्चाने धडक देऊन जाब विचारला. शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर ,जिल्हा संपर्कप्रमुख बाळा कदम, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर ,जिल्हाप्रमुख रमेश कोंडे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार . शिवाजीनगर मतदार संघाचे संपर्कप्रमुख राम कदम, संगीता ठोसर पल्लवी जावळे ,नाना वाडेकर बाळा ओसवाल, प्रशांत बधे नाना वाडेकर अशोक हरणावळ बाळासाहेब चांदेरे ,राजेश शिळीमकर, राजेंद्र शिंदे ,विशाल धनावडे ,संजय मोरे ,योगेश मोकाटे ,आनंद मंजाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सामील झाले होते.

राज्यातील आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याची केंद्राने कंपन्यांकडे जमा केलेली परंतु कंपन्यांनी थकित ठेवलेली रक्कम शेतकऱ्यांना दिली की नाही याचा शिवसेना आंदोलकांनी विचारला. दि ओरिएण्टल इन्शुरन्स महाप्रबंधक तनुजा जोशी, उपमहाप्रबंधक पी. एस. मूर्ती यांच्याकडे शेतकऱ्यांना किती विमा भरपाई दिली, याची आकडेवारी सादर सादर करा. असे रवींद्र मिर्लेकर यांनी बजावले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत संपूर्ण कार्यालय दणाणून सोडले. आक्रमक शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना गराडा घातला तेव्हा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारी आंदोलकांपुढे पुढे ठेवली .

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडे बीड ,नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, जळगाव आणि रायगड या आठ जिल्ह्यातील 29 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले. त्यातील 23 लाख शेतकरी विमा देण्यास पात्र ठरले. यापैकी या पैकी 19 लाख शेतकऱ्यांचे क्लेम कंपनीने दिले. मात्र त्यानंतर कंपनीकडे सरकारने पैसे देऊन देखील त्यांनी चार लाख वीस हजार शेतकऱ्यांचे क्लेम वटवले नव्हते. 811 कोटी रुपये देणे बाकी होते ,अशी माहिती समोर आली. 1691 कोटी रुपयांपैकी 14 80 कोटी रुपये पीक विम्याचे दिले गेले होते. शिवसेनेच्या इशारा मोर्चा नंतर कंपनीने दोन लाख शेतकऱ्यांचे दोनशे दोन कोटी रुपये विमा भरपाईपोटी दिले असल्याचे स्पष्ट झाले .

शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर म्हणाले, शिवसेनेच्या आंदोलनानंतर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई ची अकराशे आठ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. पुण्यातील दि ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनीकडून आठ जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे नऊ कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना शिवसेनेमुळे मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना इशारा दिल्यानंतर कंपन्या खडबडून जाग्या झाल्या असून जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची संपूर्ण रक्कम मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही दिली.

 

Share: