Apmc News: मुख्यमंत्र्यानी राळेगाव जाहीर सभेत उडवली काँग्रेस NCP ची खिल्ली.

68
0
Share:

मुख्यमंत्र्यानी राळेगाव जाहीर सभेत उडवली काँग्रेस NCP ची यथेच्छ खिल्ली.

आमच्या विरोधकांची परिस्थिती आज काय आहे, विरोधी पक्षात गेले तरी सत्ताधारी पक्षांसारखे वागतात. आणि आता मोदिजींच्या त्सुमानी तर त्यांची हालत इतकी खराब केलीय कि राज्यात काँग्रेस NCP नावाला देखील पाहायला मिळत नाही.

काँग्रेसची स्थिती आज काय आहे ? लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. नेते म्हणाले तुम्हीच, ते म्हणाले मी राहत नाही. दोन महिने झाले या पक्षाला अध्यक्षच नाही. शेवटी मी म्हटले, तुम्हाला अध्यक्ष निवडता येत नसेल तर मुंबईत या, गेट ऑफ इंडियावर चढा एक चिठ्ठी ठेवा. त्याच्यावर अध्यक्ष लिहा ती खाली फेका…जो झेलेलं त्याला अध्यक्ष घोषित करून टाका…

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती अशी आहे की पक्षात कुणी थांबायला तयार नाही. काही दिवसांनी पवार परिवाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिसेल…राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची कुठेही शाखां नाही आणि कुणीही आमचे कार्यकर्ते नाही. अशी अस्वस्था त्यांची असेल.

Share: