Apmc News :याला म्हणतात माणुसकी…

71
0
Share:

याला म्हणतात माणुसकी…

पुणे वरून पणजी गोवा ला जाणाऱ्या 20 पेक्षा जास्त ट्रॅव्हल राधानगरी मध्ये अडकल्या.500 पेक्षा जास्त पर्यटक पूर ओसारण्याच्या प्रतीक्षेत.आज सकाळी 4 पासून हे पर्यटक राधानगरीत अडकून पडले आहेत यामध्ये काही विदेशी पर्यटकांचा पण समावेश आहे.तुफान पावसामुळे राधानगरीतील बहुतांशी हॉटेल,दुकाने बंद असलेमुळे या सर्व प्रवाशी,लहान मुले,वृद्ध यांची खाण्या पिण्याचे खूप हाल होत होते, याची माहिती मिळताच राधानगरीचे युवा नेते उद्योजक अभिजित तायशेटे व स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ यांनी st स्टॅन्ड येथे त्यांच्या जेवणाची व अल्पोपहाराची सोय केलेली आहे.

स्थानिक st प्रशासनाने यासाठी सहकार्य केले असून,आता सर्व पूर ओसरण्याची वाट पाहत आहेत. यामधील महिला प्रवाशांना गावातील घरामध्ये आज निवासाची पण सोय करणार असलेची अभिजित तायशेटे यांनी सांगितले. सध्या राधानगरी मध्ये वीज व फोन रेंज नसले मुले या प्रवाशांच्या नातेवाईक किंव्हा मित्रमंडळींना संपर्क करायचा असलेस 02321-234024 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share: