Apmc News:Bank of India: शेतकरी , विद्यार्थी, महिलांसाठी बँकिंग सेवा सुलभ होणार-ए. के.दास

4
0
Share:

नवी मुंबई:अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांना अधिक कर्जे उपलब्ध करणे, नावीन्य आणण्यासाठी व बिग डाटा अॅनालिटिक्सचा अवलंब करण्यासाठी आयटीचा अधिकाधिक वापर करणे, यावर भर देण्यासाठी  आणि कामगिरीचा व राष्ट्रीय प्राधान्यक्रमाच्या अनुषंगाने कार्याचा आढावा घेण्यासाठी बँक ऑफ इंडिया तर्फे ठाणे जिल्हा आणि भारतातील इतर ठिकाणी विभागीय स्तरावरील चर्चात्मक व मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन केले होते. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, लहान उद्योजक, व्यावसायिक, युवक, विद्यार्थी व महिला यांच्यासाठी बँकिंग सेवा अधिक सुलभ व्हावी यासाठी पुढाकार घेणार असल्याचे बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक ए. के. दास यांनी सांगितले. ग्राहकांच्या गरजा व अपेक्षा यांची पूर्तता करणे हा यामागील हेतू आहे असेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या पहिल्यावहिल्या चर्चासत्रामध्ये, शाखांनी स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन केले, विविध समस्यांवर चर्चा केली आणि भविष्यातील धोरणाविषयी कल्पना मांडल्या.

बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक ए. के. दास यांनी सांगितले, ‘बँकेने अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबवला आहे. सरकारी बँकांसाठी विशिष्ट नियोजन करण्याच्या हेतूने या चर्चेदरम्यान अनेक विषयांवर उहापोह करण्यात आला, जसे डिजिटल पेमेंट्स, सरकारी बँकांतील कॉर्पोरेट गव्हर्नन्स, रिटेल, शेती, एमएसएमईंसाठी कर्जे, एक्स्पोर्ट क्रेडिट, 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी फिनान्शिअल ग्रिड निर्माण करणे व बँक क्रेडिट उपलब्ध करणे.’

या बैठकीमध्ये, बँकेने आर्थिक वाढीसाठी कर्जाचे पाठबळ, पायाभूत सुविधा / उद्योग, शेती क्षेत्र व ब्लु इकॉनॉमी, जल शक्ती, एमएसएमई क्षेत्र व मुद्रा कर्जे, शैक्षणिक कर्जे, एक्स्पोर्ट क्रेडिट, हरित अर्थव्यवस्था, स्वच्छ भारत, आर्थिक समावेशकता व महिला सबलीकरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, लेस कॅश/डिजिटल अर्थव्यवस्था, स्थानिक क्षमतांचा वापर या क्षेत्रांतील विविध राष्ट्रीय प्राधान्यक्रमांसाठी दिलेल्या योगदानाचाही आढावा घेण्यात आला. या सर्वंकष व तपशीलवार चर्चेमुळे, राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये एकंदर सरकारी बँका आणि विशेषतः बँक ऑफ इंडिया कशा प्रकारे योगदान देऊ शकते, याविषयी अमलात आणण्याजोग्या व नावीन्यपूर्ण सूचना मांडण्यात आल्या. या सर्व सूचना संकलित करण्यात आल्या आणि त्यावर एसएलबीसी/राज्य स्तरावर अधिक चर्चा करण्याच्या हेतूने, तसेच प्रत्येक प्रदेशातील सर्व शाखांच्या कामगिरीच्या तुलनात्मक मूल्यमापनासह त्या प्रादेशिक/झोनल स्तरावर पाठवण्यात आल्या  आहेत. एसएलबीसी स्तरानंतर, आंतरबँक व बँकांतर्गत अशा दोन्ही कामगिरीची तुलना करण्यासाठी आणि सर्व पीएसबीमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी पुढील वाटचाल निश्चित करण्यासाठी अंतिम चर्चासत्र राष्ट्रीय स्तरावर आयोजित केले जाणार आहे.

शाखा स्तरापर्यंत सर्वांना सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे या चर्चासत्र व मार्गदर्शनपर प्रक्रियेतून समोर आले आहे आणि बँक ऑफ इंडियाने त्या दृष्टीने अंमलबजावणी करण्यासाठी, कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमानुसार बदल करण्यासाठी तयारी केली आहे.

Share: