Apmc News:बेलापूर विधानसभा शिवसेना लढवणार!

24
0
Share:
-बेलापूर विधानसभा शिवसेना लढवणार..
-नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा-
आदित्य ठाकरे..
नवी मुंबई:निवडणुका झाल्यावर पुन्हा नवी मुंबईत बेलापूर मतदार संघात विजयी मिरवणुकीसाठी मी उपस्थित राहणार असे सांगत शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी प्रत्यक्षपणे बेलापूर मतदार संघावर आपला दावा सांगितलं आहे. आज नवी मुंबईत त्यांची जन आशीर्वाद यात्रा पोहचली .त्यावेळी वाशी मध्ये झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
गणेश नाईक भाजप मध्ये आल्या पासून बेलापूर आणि ऐरोली हे दोन्ही मतदार संघ नाईकांच्या घरात जातात कि काय असे सर्वाना आहे त्यामुळे या दोन्ही मतदार संघात एकाच खळबळ आहे मात्र आता आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याने बेलापूर मतदार संघावर सेनेने आपलं दावा केला असल्याचेच दिसत आहे. यादित्य यांचा या वक्तव्या वरून नुकताच भाजप मध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री गणेश नाईक  व भाजपचा विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा पदरी निराशा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे।
बेलापूर विधानसभा मतदार संघ शिवसेना सोडणार नाही ज्यामुळे शिवसेनेचे नेते विजय नाहता ठाणे जिल्हा चे पालकमंत्री एकनाथ शिंदें मार्फत  आघाडीवर असलेल्या भाजपावर कुरघोडी करून त्यांची बेलापूरमध्ये मुस्कटदाबी करण्याची व्यूहरचना मातोश्रीवरुन सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आज वाशी येथे झालेल्या विजय संकल्प मेळावा आयोजन केले होते त्यामधून दिसुन आला आहे. तर दुसरीकडे युती होवो अथवा तुटो पण कोणत्याही परिस्थिती बेलापूर विधानसभा मतदार संघ सोडणार नाही त्यामुळे शिवसैनिकांनी नाईकांचे पासून दूर राहण्याचा कानमंत्र खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.सूत्रांनी सांगितले प्रमाणे  सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेयांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.  बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची माहिती त्यांनी शिवसैनिकांना दिली. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाईकपासून चार हात दूर राहण्याचा कानमंत्र शिवसैनिकांपर्यंत पोहचविण्याचा आदेश दिल्याने नाईकच्या घराचे वासेही फिरले आहेत.युवानेता आदित्य ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसैनिक पुन्हा एकदा पछाडल्यासारखे कामाला लागले आहेत. त्यांनी कोणत्याही परिस्थिती बेलापूरची जागा ताब्यात घेऊन जिंकण्याचा  शब्द दिला आहे.विधानसभा निवडणूक तोंडावर आली म्हणून मते मागण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढलेली नाही तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांना मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि दुष्काळमुक्त, बेरोजगारी मुक्त, कर्जमुक्त, सुजलाम सुफलाम नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी  काढली आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले.
जनआशीर्वाद यात्रे निमित्ताने वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रे दरम्यान मी जनतेच्या आडीआडचणी समजावून घेतल्या. निवेदन स्विकारली. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही यात्रा तिर्थयात्रा झाली आहे. शिवसेनेच्या शाखा प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक गावात आहेत. या शाखेमधून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक सर्वसामान्य नागरिकांच्या आडचणी सोडवत असतात. शाखेत येणाNया नागरिकाची जात, धर्म, त्याने कुणाला मतदान केले हे ते विचारत नाहीत. फक्त त्याला अडचणीतून बाहेर काढणे हेच ध्येय त्यांचे असते. या शिवसैनिकांना सलाम करण्यासाठी मी आज महाराष्ट्रात फिरतो आहे. या यात्रे दरम्यान मला जे प्रेम मिळते आहे, ते मी अ‍ॅक्टर म्हणून नाही विंâवा दिसायला सुंदर म्हणून नाही, तर तुम्ही सर्वजण जी जनतेची सेवा करता, त्याची ही पोहच पावती आहे. ज्यांनी आपल्याला मते दिली आणि ज्यांनी नाही दिली, त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला नवीन महाराष्ट्राची निर्मिती करायची आहे, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
या प्रसंगी शिवसेना नेते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना उपनेते, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, शिवसेना उत्तर भारतीय सेलच्या वतीने ओपनशेड फ्रूट मर्चेंट्स असोसिएशन आणि बोरीवली फ्रूट एंड वेजिटेबल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत.जनआशीर्वाद यात्रा आज सायंकाळी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे पोहचल्यानंतर तरुणाईने एकच जल्लोष केला.
Share: