Apmc News Breaking:अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू-अँड.आशिष शेलार

65
0
Share:

*अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू*

*शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची माहिती*

मुुंबई:  अशासकीय खाजगीशाळांमधील अर्धवेळशिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड.आशिष शेलार यांनी आज घोषित केले. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

राज्यातील अशासकीय खाजगी शाळातिल पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तसेच अनुदानित व महापालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र अशासकीय खाजगी शाळातिल अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथपाल व रात्र शाळेचे शिक्षकांचा निर्णय प्रलंबित होता.
राज्यात 1012 अर्धवेळ शिक्षक, 1431 अर्धवेळ ग्रंथपाल तसेच 165 रात्र शाळांमधे काम करणारे 630 रात्र शाळा शिक्षक, 219 शिक्षकेत्तर कर्मचारी असून या सर्वांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करणारा शासन मंत्री अँड आशिष शेलार यांनी घेतला असून त्याचा निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

Share: