Apmc News Breaking:सिलवासा पोलिसांच्या ताब्यातून 3 अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यातून फरार

13
0
Share:

वसई: सिलवासा पोलिसांच्या ताब्यातून 3 अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यातून पळून गेले आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीतील सातीवली खिंड येथून हे पळाले आहेत. जयराम लाखमा दळवी वय 21 वर्षे , गणेश उर्फ बोक लाखमा दळवी वय 20 वर्ष, मार्टिन राज्या माढा वय 30 वर्ष असे पाळालेल्या दरोडेखोर चे नाव असून हे सर्व पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील राहणारे आहेत. काल मंगळवारी सकाळी ठाणे जेल मधून या तीन दरोडेखोरांना गुजरात सिलवासा जेल मध्ये हजर करण्यासाठी नेले होते, सिलवासा जेल मधून परत ठाणे जेल मध्ये घेऊन जाताना रात्री 8 वाजता वसईच्या सातीवली खिंडीतून फरार झाले आहेत. उलटी आल्याचा बहाणा करून यांनी गाडी थांबविण्यास सांगितली. गाडी थांबताच तीनही आरोपी पोलिसांना हिसका देऊन फरार झाले आहेत. या चोरट्यावर मुंबई, ठाणे, पालघर सह गुजरात राज्यात दरोडा चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत वसई च्या वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे चोरटे कुठे दिसले तर वालीव पोलीस शी संपर्क साधावा असे अहवानही वालीव चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी केले आहे..
पाळालेले आरोपी कुणाला आढळल्यास वालीव पोलीस ठाणे संपर्क क्र 8669604017
पोलीस निरीक्षक
8669604016
तपासी अधिकारी
9503005002
यावर संपर्क करण्यास करण्याची पोलिसणाकडून अहवान ही केले आहे

Share: