Apmc News Breaking: उद्या पासून खारघर सेंट्रल पार्कमध्ये भाजीपला व फळ मार्केट सुरू.

35
0
Share:
75 एकर भूखंडवर सुमारे 1100 चौरस फुटाचे जवळ 400 गाळे तयार.
-एपीएमसी प्रशासन कडून येणाऱ्या ग्राहक ,कामगार व व्यापारी साठी रस्ते,वीज,पाणी व शौचालयचा व्यवस्था 
नवी मुंबई:मुंबई एपीएमसीतील भाजीपाला व फळे मार्केटमधील गर्दी कमी न झाल्यास मार्केट तात्पुरत्या स्वरूपात खारघर सेन्ट्रल पार्कमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता जे सोमवारी 20 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सिडकोने यासाठी जवळपास 75 एकर भूखंड उपलब्ध करून दिला असून सुमारे 1100 चौरस फुटाचे जवळ 400 गाळे तयार करण्यात आली आहे.सोशल डिस्टनसिंग मेंटन करण्यासाठी दोन लेन मध्ये शंभर फुटाचे रस्ता सोडण्यात आले आहे त्याच वरोवर येणाऱ्या ग्राहक ,कामगार व व्यापाऱ्या साठी रस्ते,वीज,पाणी व शौचालयचा व्यबस्था करण्यात आली आहे अशी माहिती  कार्यकारी अभियंता आर.आर.खिस्ते यांनी दिली आहे.
परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भाजी व फळे मार्केटमधील होणारी गर्दी पहाता, कोरोनाचा प्रसार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना कमी पडू लागल्या होता. धान्य व मसाला मार्केट मध्ये दोन व्यपरियाला कोरोनाचे लागण झाल्याने बाजारात माथाडी कामगार,व्यपारी व ट्रान्सपोटर मध्ये भीती निर्माण झाले होते .बाजारात  सोशल डिस्टनसिंग न झाल्यने फळ व भाजीपाला मार्केट खारघरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, सिडको व बाजार समिती प्रशासनाला त्याविषयी सूचना केल्या होते. सिडकोने तत्काळ खारघर सेक्टर 28, 29 मधील 75 एकर भूखंड तात्पुरत्या स्वरूपात भाजी मार्केट स्थलांतर करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. भुखंडाची साफसफाई करण्यात आले असून तेथे 20 एप्रिलपासून भाजीपाला व फळ मार्केट  सुरू होणार आहे.
मुंबई एपीएमसीत भाजीपाला व फळ मार्केटमध्ये सुमारे 2000  गाळे असून अतिरिक्त भाजीपला मार्केटमध्ये 285 गाळे आहेत. हे गाळे 200 चौरस फूटाचे असून एकाला एक लागून आहेत. यामुळे मार्केट मध्ये प्रचंड गर्दी होते. खारघरमध्ये मुळ मार्केटच्या पाच पट मोठ्या आकाराचे गाळे तयार करण्यात आले आहेत अशी माहिती एपीएमसी प्रशासक व सचिव अनिल चव्हाण यांनी दिली आहे.
एस टी डेपोच्या भूखंडाचा वापर
बाजार समितीच्या फळ मार्केटला लागून एस टी डेपोचा भूखंड मोकळा आहे. त्या भुंखंडाची ही साफसफाई करण्यात आली आहे. त्या भूखंडावर सोमवार पासून तरभुज व खरभुज लूज शेतमालाची 50 गाड्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे हापूस आंब्याचा शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल  असे दिसून येत आहे .
Share: