Apmc News:दहीहंडी उत्सव आपली परंपरा असल्यामुळे सामाजिक भान राखून साजरा झाला पाहिजे-सोपानसेठ मेहेर

94
0
Share:

दहीहंडी उत्सव आपली परंपरा असल्यामुळे सामाजिक भान राखून साजरा झाला पाहिजे-सोपानसेठ मेहेर

नवी मुंबई : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंदाच्या वर्षी विविध दहीहंडी आयोजकांनी उत्सवातून माघार घेतल्याने गोविंदा पथकांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण आहे. दुसरी कडे दहीहंडी उत्सव आपली परंपरा असल्यामुळे सामाजिक भान राखून साजरा झाला पाहिजे. मात्र आयोजकांनी आयोजन रद्द करू नये. दीड-दोन महिन्यांपासून सराव करणाºया गोविंदांसाठी साधेपणाने आयोजन करून त्यांना प्रोत्साहन द्यावे अशी प्रतिक्रिया
नवी मुंबई भाजीपाला व्यापारी वेल्फेयर असोसिएशनचे अध्यक्ष सोपानसेठ मेहेर यांनी केली आहे


तुर्भे येथे भाजीपाला मार्केट परिसरात सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा नवी मुंबई भाजीपाला व्यापारी वेल्फेयर असोसिएशनची वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आली आहे. हा उत्सव मागील 10 वर्षापासून असोसिएशनचे अध्यक्ष सोपानसेठ मेहेर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होत आहे.


या वर्षी कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरमध्ये पूरग्रस्त लोकांसाठी संस्थांतर्फे 500 साड्या आणि 500 ब्लैंकेट पाठवण्यात येणार आहे. भाजीपाला मार्केट मध्ये होणाऱ्या दहीहंडी उत्सवात नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबईच्या अनेक उपनागरातून आणि नालासोपारा, वसई, विरार येथून दरवर्षी 150 ते 200 गोविंदा पथक दहीहंडीला सलामी देण्यासाठी येतात.संस्थाच्या वतीने सर्व गोविंनंदापथकाचे व इतर लोकांसाठी दरवर्षी जवळजवळ 9 ते 10 हजार लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त ह्या संस्थेच्या एक हेतू असा आहे येथे येणाऱ्या सर्व गोविंदपथकाला आकर्षक ट्रॉफी आणि भगवान श्रीकृष्णची एक अत्यंत मनमोहक मूर्ति देण्यात येणार आहे. संस्थांतर्फे सर्व गोविंदा पथकांना निवेदन करण्यात आली आहे की या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्याने यावे.

Share: