Apmc News exclusive- न्याय मागण्याचा अनोखा प्रकार,न्याय मागण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने चक्क न्यायाधीशाच्या दालनालाच टाळ ठोकून सील मारला

23
0
Share:

वसई : न्याय मागण्याचा अनोखा प्रकार वसई न्यायालयात घडला आहे. न्याय मागण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने चक्क न्यायाधीशाच्या दालनालाच टाळ ठोकून, त्याला सील मारल्याची घटना गुरुवारी घडली आहे. याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पण या घटनेने न्यायालयातील सुरक्षिततेचे मात्र तीनतेरा वाजले आहेत. वसई न्यायालयात गुरुवारी दुपारी न्यायाधीश व सर्व कर्मचारी जेवायला गेले असताना, सह दिवाणी न्यायाधीश क स्तर न्यायाधीश एस.बी. पवार यांच्या चेंबर रुमच्या दरवाजाला टाळे ठोकल्याची घटना घडली. या टाळ्या बरोबर एक चिठ्ठी लावण्यात आली होती. या चिठ्ठीमध्ये मुंबई सेशन कोर्टाने सलमान खान याला ५ वर्षाची शिक्षा दिली असतानाही तीन तासात उच्च न्यायालयाने जामीन दिला.  मी कर भरतो, त्यातून न्यायाधीशांना पगार मिळतो  तर मला का न्याय मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला होता.  त्यावर डॉ. फैय्याज खान असे नाव लिहण्यात आले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share: