Apmc News:संपूर्ण देशात हाय अलर्ट , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांच मार्केटच्या सुरक्षा “रामभरोसे”

50
0
Share:

-संपूर्ण देश हाय अलर्ट वर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पांच मार्केटच्या सुरक्षा “रामभरोसे”

नवी मुंबई:काश्मीरमधील घडामोडींनंतर मुंबईसह देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणा (आय.बी.)ने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बकरी ईद, स्वातंत्र्य दिन, रक्षा बंधन,गणेश चतुर्थी व आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता नवी मुंबई पोलिसांसह सर्व तपास यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मात्र वाशी येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये पांच मार्केटच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्था सध्या “राम भरोसे” आहे.


शेतकऱ्यांची अडवणूक,फसवणूक आणि गैरव्यवहाराची बाबतीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कुप्रसिद्ध आहे.वाशी मध्ये सुमारे दोनशे एकरांवर बाजार समितीचा बिस्तारआहे,समितीमध्ये भाजीपाला,फळे,कांदा-बटाटा,धान्य आणि मसाले अशी पंच मार्केट आहेत,समितीची वार्षिक उलाढाल सुमारे 10 हजार कोटी पेक्षा जास्त आहे.ब्यापाऱ्या कडून कोटी रूपयांची टॅक्स घेणाऱ्या वाशी येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था सध्या “राम भरोसे” आहे.
स्वातंत्र्य दिवस, रक्षाबंधन, जम्मू आणि काश्मीरच्या कलम 370 आणि 35-ए काढल्यानंतर संपूर्ण देश हाय एलर्ट वर आहे. याच दरम्यान देशाचीच नव्हे तर पूर्ण एशियाखंडात सर्वात मोठी वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये असलेल्या पांच मार्केट सुरक्षाच्या नावावर “आव-जाव, घर तुम्हारा” अशी स्थिति दिसून येत आहे.


वाशी येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला,फळे,कांदा-बटाटा,धान्य आणि मसाले अशी पंच मार्केट आहेत, या सर्व पाच घाउक बाजाराचा नियंत्रण येथील बाजार समिती प्रशासक करत आहे. बाजार समिती पांच मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या जवळपास 4 हजार घाउक व्यापार्यांकडून दरवर्षी लाखो-कोटी रूपयाचे कर वसूली करते पण सुरक्षाच्या नावावर काहीच नाही.
ही गंभीर स्थिती पाहुन पूर्ण बाजारात कंट्रोल करणाऱ्या एपीएमसी पोलिस स्टेशन मागील सहा महिन्यापासून घाउक बाजाराचे सुरक्षा प्रश्न कशे सुटतील त्याचा प्रयत्न करत आहेत. एपीएमसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम लोकांच्या सुरक्षा दृष्टीने काही दिवसापूर्वी बाजार समितीच्या अधिकारी सर्व घाउक व्यापारी संगठन, माथाडी मजदूर संगठन आणि वाहतूक (ट्रांसपोर्टर) प्रतिनिधिसोबत एक बैठक ठेवली होती. या बैठकीत सतीश निकम यांनी काही मुद्दे सगळेच्या समोर ठेवले होते. आपल्या प्रस्ताव मध्ये ठेवलेले मुद्दे असा होता पांच घाउक बाजारात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व मार्गावर 24 तास सीसीटीवीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात यावे. या संदर्भात बाजार समितीला वेळोवेळी तीनवेळा पत्रब्यावहार करण्यात आली मात्र बाजार समिती आता पर्यंत दुर्लक्ष केला आहे ज्यामुळे असे दिसून येत आहे बाजार समितिच्या सुरक्षा “राम भरोसे” आहे.
त्याच बरोबर एपीएमसी पोलीसातर्फे नवी मुंबई महापालिकेला पत्र पाठवण्यात आली आहे त्यामध्ये मुख्य रस्त्यावर व बाजार समिती मध्ये सुरक्षाच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावण्यासाठी अपील केली आहे.
आपल्या या पत्रामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी बाजार समितीचे प्रशासनला काही सल्ला दिली आहे ते खालील प्रमाणे-
– पांच घाउक बाजाराच्या जवळ जवळ 4 हजार घाउक व्यापाऱ्यांना फोटो आईडी देणे
– जवळजवळ 10 हजार माथाडी कामगारांना फोटो आईडी देणे
– वाशी घाउक बाजारात दर दिवसी येणाऱ्या मुंबई एमएमआर भागातून जवळजवळ 6 ते 7 हजार रिटेलर व्यापार्यांना फोटो आईडी देणे
– घाउक बाजारात काम करणाऱ्या जवळजवळ 5 हजार दैनिक कामगारांना फोटो आईडी देणे
– घाउक बाजारात रजिस्टर असलेल्या जवळजवळ 4 ते 5 हजार वाहतूक धारकांना पास देण्यात यावी

Share: