Apmc News: शौचालयातील पाण्यात पायाने साफ होतात केशरी गाजर..मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील किळसवाना प्रकार ..

32
0
Share:

शौचालयातील पाण्यात ,पायाने साफ होतात केशरी गाजर.
-मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील किळसवाना प्रकार ..

नवी मुंबई : गाजर अरोग्यासाठी उत्तम मानले जातात कारण गाजरामध्ये अनेक जीवनसत्त्व असतात त्यामुळे डॉक्टर नेहमी गाजर खाण्याचा सल्ला देतात .मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजारात मिळणारे केशरी गाजर कश्या पद्धतीने आपल्या घरा पर्यत पोहचतात हे तुम्ही पहिले तर हे गाजर खाताना तुम्ही एकदा नाही अनेकदा विचार कराल.

थंडी सुरु झाली कि बाजारात लाल रंगाचे मोठमोठी गाजर मोठ्या प्रमणात पाहायला मिळतात . कारण थंडीच्या हंगामात हे गाजर येतात .हि लाल गाजर महाराष्टार्तून येतात. थंडी संपली कि हे गाजर बाजारात येत नाहीत. या गाजरा व्यतिरिक्त आकाराने लहान गुलाबी भगवे गाजर मात्र वर्षभर बाजारात पाहायला मिळतात. या गाजरांची चव हि लाल गाजरापेक्षा काहीशी वेगळी असते. मात्र दुधाची तहान ताकावर या नुसार हे लाल गाजर बाजारात खपवले जातात. मात्र हे गाजर बाजारात आल्यापासून ते लोकांच्या घरात पोह्चेपार्यात वेगवेगळ्या प्रक्रियेमधून येतात ती पाहिल्यावर हे गाजर खावीत कि खावू नये असा प्रश्न सर्वांनाच पडेल.

वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मधील घाऊक भाजीपाला बाजारात दररोज दहा ते बारा गाड्या भरून हे गुलाबी गाजर येतात. हे गाजर नाशिक आंबेगाव पुरंदर मधून राजस्थान मध्य प्रदेश इंदोर मधून येतात मात्र हे गाजर बाजारात आल्यावर ते पूर्णपणे चिखलात बरबटलेले असतात . त्यामुळे बाजारात आल्यावर ते पाण्याने धुतले जातात मात्र हे गाजर धुण्याची प्रक्रिया हाताने केली जात नाही तर चक्क पायाने केली जाते. हे गाजर पायाने मळून धुतले जातात. आणि हे धुण्यासाठी शौचालय मधील पाण्याचा वापर केला जात आहे.
हे तुमहाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल .

गाजर बाजारात आल्यावर त्यांना चिखल लागलेलं असते. त्यामुळे गाजर धुण्यासाठी ते पहिल्यांदा पाण्याच्या गोल पिंपात ओतले जातात. त्यात पाणी भरले जाते. आणि गाजराना भिजू दिले जाते. गाजर भिजले कि त्यानां लागलेला चिखल हि मोकळा होतो मग त्या पिंपात एक माणूस उतरतो आणि पायाने त्या गाजराना मळायला सुरुवात करतो. त्या गाजरा सोबत तो हि त्या पिंपात अर्धा बुडालेला असतो अश्या स्थितीत तो गाजर पायाने साफ करत असतो. दररोज अश्याच पद्धतीने बाजारात येणारी हि गाजर अशीच साफ केली जातात. वर्षानुवर्षा पासून गाजर स्वच्छ करण्यासाठी हीच पद्धत वापरली जाते. त्यामुळे बिनदिक्कतपणे हीच पद्धतीने गाजर सफाई सुरु आहे. मात्र यामुळे हायजीन चा मुद्दा समोर आला आहे. अश्या प्रकारे पायाने गाजर साफ करणे योग्य आहेका असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

अश्या प्रकारे गाजर धुण्याची पद्धत बंद व्हावी अशी आमची मागणी आहे .गाजर धुण्यासाठी वेगळी व्यवस्था करायला पाहिजे .यासाठी बाजार समिती कडून वेगळी व्यवस्था करून दिली जाईल अशी अपेक्षा व्यापार्यांना आहे.मात्र बाजार समिती कडून हि व्यवस्था करून दिली जात नाहीय.

ग्राहक –पिंपात गाजर तेवून माणूस पिंपात उतरून पायाने गाजर घासतो हे बघतानाही फार किळसवाणे आहे अशी गाजर खायचे कसे हा प्रश्न आम्हाला पडला आहे.

Share: