Apmc News: Mahalaxmi Saras 2019-अस्सल ग्रामीण पदार्थांची मेजवानी नेरुळ येथील आगरी- कोळी संस्कृती भवनात आज पासून सुरू

10
0
Share:

-नवी मुंबईत बुधवारपासून अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री; देशभरातील बचत गटांची सहभागी

नवी मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील बचतगटांच्या तसेच ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांच्या अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आज पासून नवी मुंबईत आगरी कोळी भवनात पार पडला आहे या प्रदर्शनाचे उदघाटन ग्राम विकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा हस्ते करण्यात आली या वेळी आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होते .

प्रदर्शनात राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातील बचतगट सहभागी झाले असून 120 स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे 20 स्टॉल असून त्यातून नवीमुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

नेरुळ पामबीच रोड येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सकाळी दुपारी 3 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आली. नवी मुंबईकरांनी प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण महिला बचतगट आणि कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, तसेच त्यांच्या नानाविध अशा कलाकुसरी, उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचतगटांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, साहित्य, नाविन्यपूर्ण कला व खाद्यपदार्थ शहरी नागरिकांपर्यंत पोहोचविता येतात. मागील दीड दशकात या प्रदर्शनातून सुमारे 34 जिल्हा व 351 तालुका मध्ये इंटेसिव्ह पध्दतीने काम करण्यात येत आहे,अभियान अंतर्गत आतापर्यंत 4 लक्ष स्वयंसहाय्यता गटांची स्थापना झाली असून त्यामाध्यमातून 43 लक्ष कुटूंबाना उमेद अभियानात जोडण्यात आली आहे,त्याच बरोबर जबलपास 520 कोटी समुदाय निधी तर बँकांमार्फत 5250 कोटीचे कर्ज गटांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.अभियानांतर्गत 7.5 लक्ष कुटूंबाना उपजीबीकेचेव विविध स्तोत्र निर्माण केले असून त्यामाध्यमातून जवळपास 645 कोटीचे उत्पन निर्माण झालेल्या आहे .गावपातळीवर 50 हजार प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती कार्य करत आहे.
या प्रदर्शनास जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी, तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, सोलापुरी चटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ आदी खाद्य पदार्थांबरोबरच कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी, वारली चित्रकला, हस्तकला, हातमागाच्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू आदी विविध उत्पादने प्रदर्शनात लावण्यात आली आहे.


21 अगस्ट 2019 ते 30 अगस्ट 2019 पर्यंत प्रदर्शन लावण्यात आली असून दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता गटातील महिलांचे अधिक उतचाव वाढवा व त्यांना गरिबीतून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा मिळावी या साठी या प्रदर्शनात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देउन साहित्याची खरीदी करावी अशी विनंती करण्यात आली आहे

Share: