Apmc News:पूरग्रस्त भागातील जनावरांवर मोफत उपचार करणार नामदार महादेव जानकर यांनी घोषणा

5
0
Share:

-पूरग्रस्त भागातील जनावरांवर मोफत उपचार करणार
नामदार महादेव जानकर यांनी घोषणा
-पुरात वाहून गेलेल्या मोठ्या जनावरास 30 हजार रुपये तर लहान जनावरास 16 हजार रुपये देण्याची घोषणा

मुंबई: कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाण्यामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढणार आहे. या जनावरांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे.
नामदार महादेव जानकर पूढे म्हणाले की, पुरामध्ये वाहून गेलेल्या मोठ्या जनावरास राज्य सरकारतर्फे 30 हजार रुपये, लहान जनावरास 16 हजार रुपये आणि शेळी/ मेंढीसाठी 3 हजार रुपये राज्य शासनातर्फे केली जाणार असल्याची माहिती नामदार महादेव जानकर यानी दिली.राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 20 डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात काम करत आहे. केरळ मधून 10 पशुवैद्यकीय डॉक्टर आहोरात्र काम करत आहेत. पूरग्रस्त भागातील सर्व जनावरांवर मोफत उपचाराबरोबरच ओषधे आणि लसीकरणही मोफत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहायता निधीस 20 लाख रुपयांची मदत
महाराष्ट्र मत्स्यद्योग महामंडळ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रूपयाप्रमाणे 20 लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.

 

Share: