Apmc News:नाशिक बाजार समितीचे सभापती  शिवाजी चुंभळे यांना लाच घेताना अटक

4
0
Share:

-नोकरी पुन्हा हवी तर मला 10 लाख रुपये पाहिजे असे सभापतींनी कर्मचाऱ्याकडे केली होती. या कारवाईने खळबळ उडालीय.

-चुंभळे हा भाजप आणि शिवसेनेशी संबंधीत असून गरजेनुसार तो पक्ष बदलत आपला प्रभाव निर्माण करत असतो अशीही माहिती आहे

नाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला सध्या ग्रहण लागली आहे. समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना लाच घेताना अँटीकरप्शन विभागाने अटक केलीय. चुंभळे याने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्याला कामावर पुन्हा घेण्यासाठी लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली. या घटनेनं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत खळबळ उडालीय.बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्याला काही कारणानिमित्त कामावरून कमी करण्यात आलं होतं. त्यामुळे रोजगारासाठी तो कर्मचारी भटकत होता. त्याने सभापती असलेल्या चुंभळे यांना कामावर घेण्याची विनंती केली. नोकरी पुन्हा हवी असल्यास 10 लाख रुपये देण्याची मागणी चुंभळेने कर्मचाऱ्याकडे केली

एवढे पैसे देण्याची ऐपत त्या कर्मचाऱ्याकडे नव्हती. सभापती लाच मागत असल्याने त्या माजी कर्माचाऱ्याने थेट अँटीकरप्शन विभागाकडे तक्रार करून माहिती दिली. त्यानंतर अँटीकरप्शन विभागाने सापळा रचला. त्यानुसार त्या कर्मचाऱ्याने चुंभळेला पाच लाख रुपये देण्याचं मान्य केलं. ठरल्यानुसार त्याने चुंबळेंना पैसे दिले आणि त्याच वेळी अँटीकरप्शन विभागाने त्यांना अटक केली.

Share: