Apmc News Breaking:एनसीपी अध्यक्ष शरद पवार व धनंजय मुंडे  शनिवारी पुरग्रस्त भागात पाहणी करणार

21
0
Share:

एनसीपी अध्यक्ष शरद पवार व धनंजय मुंडे  शनिवारी पुरग्रस्त भागात पाहणी करणार

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार हे  शनिवार दिनाक 10 ऑगस्ट रोजी पुरग्रस्त सांगली, सातारा जिल्ह्यात जाणार असून, या दौर्‍यात ते पुरग्रस्त भागांना भेटी देवुन तेथील नागरिकांना ही भेटणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे ही त्यांच्या समवेत असणार आहेत.

सकाळी 09 वाजता ते तांबावणे ता.फलटण, जि.सातारा येथील पुरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 03 वाजता पलुस, ता.जि.सांगली येथील पुरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेवुन त्यांना दिलासा देणार आहेत. सायंकाळी 05 वाजता ते सांगली येथील पुरग्रस्त व कॅम्पला ही भेट देणार आहेत.

Share: