Apmc News:शिवसेना-भाजपमध्ये राडा, शौचालयाच्या उदघाटनावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली, श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न

14
0
Share:

शिवसेना-भाजपमध्ये राडा

शौचालयाच्या उदघाटनावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली

श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न

मुंबई: शिवसेना भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शनिवारी सकाळी दहिसर पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक 3 मधील धाराखाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या उदघाटनाचे श्रेय लाटण्यावरून शिवसेना भाजपचे आमदार व कार्यकर्ते पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले. मात्र या दोघांच्या भांडणात सामान्य नागरिकांसाठी बांधण्यात आलेले शौचालय सेवेत येण्यास लांबणीवर पडले. दहिसर पूर्व येथील धाराखाडी परिसर वनखात्याच्या अंतर्गत येतो. या परिसरात असलेल्या नागरी वस्तीसाठी पालिकेच्या फंडातून 10 सीटर शौचालय बांधले. शनिवारी शिवसेनेच्या वतीने दुपारी 3 वाजता उदघाटन होणार होते. मात्र त्याआधीच शनिवारी सकाळी 10 वाजता विधानपरिषदेचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी नारळ फोडत शौचालयाचे उद्धाटन करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद,शाखाप्रमुख प्रकाश पुजारी व शिवसेना कार्यकर्त्यांनी शौचालयाभोवती घेराव घालून उदघाटन करण्यास अटकाव करत घोषणाबाजी केली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर व प्रकाश सुर्वे दोघेही उपस्थित होते. अखेर यात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. रीतसर पालिकेची परवानगी घेऊन उदघाटन करा अशी सूचना पोलिसांनी या दोघांना दिली.

Share: