Apmc News: मागण्या मान्य न झाल्यावर वाशी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ करणार तीव्र आंदोलन

3
0
Share:
घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ आंदोलनाच्या पवित्र्यात,
मागण्या मान्य न झाल्यास तर तीव्र आंदोलनाच्या इशारा
नवी मुंबई:वाशीच्या एपीएमसी येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ यांनी आंदोलनाच्या इशारा दिला आहे. या बाबत घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ यांनी ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति, मुंबईयांच्या नावे पत्र लिहून आपल्या 20 वर्षापासून प्रलंबित सर्वच्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे. महासंघाने दिनांक 30 जून 2019च्या दिवसी बाजार समिति सोबत झालेली बैठकीच्या उल्लेख करून खालील लिहलेली समस्यासह इतर सर्व समस्या तात्काळ दूर करण्याची मागणी केली आहे-
1) मालधक्यावरील व रस्त्यावरील व्यापार
2) पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे
3) मार्केटच्या कामकाजाची वेळ ठरविणे
4) सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणे
महासंघाने बाजार समितीला अग्रिम इशारा दिला आहे की दिनांक 20 आगस्ट 2019 पर्यंत वरील सर्व समस्या सोडविणयात याव्यात. अन्यथा बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2019 रोजी पासून घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली तिव्र आंदोलन छेडले जाईल. त्यामध्ये बाजार समिती बरोबर पुर्णपणे असहकार केला जाईल. बाजार समितीची कुठल्याही प्रकारची देयके व्यापाऱ्यांकडून भरली जाणार नाहीत.
Share: