8 रुपयांसाठी रिक्षा चालकाला बेदम मारहाण करणाऱ्या इसमाला एपीएमसी पोलिसांनी केल गजाआड

3
0
Share:
नवी मुंबई:अवघ्या 8 रुपयांसाठी एपीएमसीतील मसाला मार्केटच्या वाहेर रिक्षा चालकाला प्रवाशेने लाथाबुक्याने बेदम मारहाण करून भाजीपाला मार्केट मध्ये  पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमधून दिसुन आल्यानंतर  एपीएमसी पोलिसांनी आरोपीला गजाआड केला आहे.मारहाण झालेल्या रिक्षा चालकाला गंभीर दुखापद झाल्यामुळे त्याला dy पाटील रुग्णालयात उपचार चालू आहे.
एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले प्रमाणे 10 सप्टेंबर रोजी आरोपी उमेश थोरात काही दिवसांपूर्वी गावांतून रोजगार साठी नवी मुंबईत आला होता त्यांनी एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये काम करण्यासाठी अन्नपूर्णा चौकातून रिक्षा पकडला होता मसाला मार्केट समोर उतरल्या नंतर  भाडे वरून रिक्षा चालकसोवत वाद झाल्यानंतर रिक्षा चालकला उमेशने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकला  पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात नेले. उमेश मारहाण केल्यानंतर भाजीपाला मार्केट मध्ये पळून जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आला अखेर  पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हाजर केला कोर्टाने 26 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवली आहे।
Share: