नवी मुंबईत गांजाची तस्करी करणारी टोळीला एपीएमसी पोलिसांनी केली गजाआड

5
0
Share:

*नवी मुंबईत गांजाची तस्करी करणारी टोळीला ए पी एम सी पोलिसांनी केली गजाआड*

*नवी मुंबईतील गांजा व अमली पदार्थ पुरविणाऱ्या टोळ्या उध्वस्त करण्याचे परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिले होते आदेश.*

*ट्रॅव्हलिंग बॅगमधून आणलेला १०५ किलो गांजा हस्तगत*

नवी मुंबई व ठाणे परिसरात गांजा या अमली पदार्थांची तस्करी करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलीस शिपाई सचिन ठोंबरे यांना मिळाली होती त्या महितीच्या अनुषंगाने ए पी एम् सी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक भूषण पवार व त्यांच्या पथकाने ७ ऑक्टोबरला नौशाद अली शेख(३३) ग्रीन पार्क झोपडपट्टी सेक्टर १९ येथे राहणाऱ्या व्यक्तीच्य टेम्पो क्रमांक ४३ ए डी ३६४४ मध्ये २ किलो गांजा सापडल्या त्यामुळे त्याच्यावर ए पी एम सी पोलीस स्टेशनमध्ये अमली पदार्थ विरोधी कायदा कलम ८(क)२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेचा तपास वपोनि सतीश निकम , पोलीस निरीक्षक गुन्हे बसित अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सह.पोलिस निरीक्षक भूषण पवार करत होते.

याघटनेमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबईत गांजा व अमली पदार्थ पुरवणारी टोळी उध्वस्त करून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ १ पंकज डहाणे, सहा पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे माहिती घेत असताना पोलीस शिपाई सचिन ठोंबरे यांना गांजा पुरविणाऱ्या दोन व्यक्ती बुलढाणा येथून लक्सरी बसने गांजा घेऊन सानपाडा ब्रिजजवळ उतरणार असून हा माल रिक्षाद्वारे सर्वत्र पोहचवला जातो

अशी माहिती मिळाली त्यानुसार छापा मारून प्रवीण सुपडा चव्हाण (२७)राहुल दशरथ चव्हाण (२७) हनवखेड ता. मुताळ जि. बुलढाणा, आशिष प्रेम शंकर यादव (कल्याण पूर्व), सुनिल कुमार यादव साठेनगर ठाणे यांच्याकडून ट्रॅव्हलिंग बॅगमधून आणलेला १०५ किलोचा गांजा हस्तगत करण्यात आला असून अमली पदार्थ विरोधी कायदा कलम ८(क)अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक भूषण पवार करीत आहेत.

Share: