APMC Vegetable Market : काकडी 8 रुपये तर दुधी 15 रुपये किलो , मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे आवक वाढल्याने दरात स्थिर

27
0
Share:
नवी मुंबई:परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते.आता हळूहळू पूर्ववस्थावर आली आहे भाजीपाला बाजारात आवक वाढल्याने सर्व सामात्र्समान्य आता सुटकेचा श्वास घेऊ शकतात. घाऊक बाजारात आज जवळपास 600 गाड्यांची आवक झाली असून. भाज्यांच्या दरात घसरण झाली असून भाज्यांचे दर हे पुन्हा स्थिर झाले आहेत. पुणे ,नाशिक,नगर,कर्नाटक,गुजरात,जळगाव,लातूर या सर्व ठिकाणांहून आज गाड्यांची आवक मोठया प्रमाणावर झाली आहे अशी माहिती भाजीपाला मार्केटचे व्यपारी श्यामराव मोहिते  पाटील यांनी दिली आहे.
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. परंतु  जवळपास 8 महिन्यांनंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये  गाड्यांची आवक सुरळीत झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. तर आज भाज्यांच्या किंमतीत किती घसरण झाली आहे हे आपण जाणून घेऊया
काकडी 8 ते 12 रु किलो
दुधी 15 ते 20 रु किलो
मिरची 30 ते 45 रु किलो
शिमला मिरची 25 ते 40 रु किलो                  
भेंडी – 20 ते 30 रु
गवार -35 ते 45 रु किलो
कोबी-20 ते 30 रु किलो
फरसबी-45 ते 55 रु किलो विकला जात असून 
शेवगा-45 ते 55 रु किलो
रताळे-25 ते 30 रु किलो
कोथिंबीर-10ते 15 जुडी
मेथी-15 ते 20 जुडी
वाटाणा-100 ते 120 रु किलो
टोमॅटो-20 ते 25 रु किलो विकला जात आहे. 
आता भाज्यांच्या किंमतीत जी घसरण झाली आहे दिवाळी पर्यंत आशेच राहणार अशी माहिती भाजीपाला मार्केटच्या संचालक  शंकर पिंगळे यांनी सांगितले.
Share: