Apmc News: फळ मार्केट ओपन शेड मधील व्यापार पाण्यात

93
0
Share:
नवी मुंबई: गेल्या महिनाभर  पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे फळ बाजारात गुढगाभर पाणी साचत आहे. त्यामुळे  गाळा धारक व्यापाऱ्यांना फारसा त्रास सहन करावा लागत नसला तरी बिगर गाळा धारक व्यापाऱ्यांनचा व्यापार मात्र पाण्यात बुडत आहे. ओपन शेड मध्ये सुरु असलेल्या या व्यापाराच्या जागी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने त्या पाण्यात भिजून फळांचे नुकसान तर होत आहेच पण त्याच बरोबर पाण्यात उभे राहून व्यापार कसा करायचा हा प्रश्न कायम असतानाच ग्राहक हि या ठिकाणी खरेदी करायला पुढे येत नसल्याने इथल्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आज या संदर्भात या व्यापाऱ्यांची एक बैठक पार पडली यावेळी  बाजार समितीने  ओपन शेड धारकांना हि सुविधा पुरवाव्यात अशी मागणी यावेळी सर्वानी केली . या पावसात यामुळे व्यापार पाण्यात बुडाल्याची भावना या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
फळ बाजारात दीडशे च्या आसपास  व्यापारी हे ओपेनशेड मध्ये फळांचा घाऊक व्यापार करतात. बाजारात एक ठिकाणी या व्यापाऱ्यांना पूर्वी ठराविक जागा देण्यात अली होती. मात्र त्या ठिकाणी सुविधा इमारत बांधण्याचे काम सुरु झाल्याने सध्या या व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात म्हणून बाजाराच्या गेट जवळच शेड उभारून बाजार समितीने व्यापार करण्याची परवानगी दिली आहे. खांब उभारून वर ताडपत्री लावून त्यासाठी शेड तयार करण्यात आला आहे. उन्हाळ्यात हिवाळ्यात तर परिस्थिती ठीक असते मात्र पावसाळ्यात या ठिकाणी सर्वांचेच हाल होतात. सध्या  बाजारात सारखे पाणी साचत असल्याने  ओपेनशेड मधील व्यापाऱ्यांना इथे  व्यापार करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने खाली ठेवलेल्या फळांचे बॉक्स केरेट पाण्यात बुडत आहेत. त्यामुले फळे ओली होऊन लवकर खराब होत आहेत. त्यामुले पाण्यात उभे राहून व्यापार कसा करायचा असा प्रश्न व्यापार्यां समोर आहे . पावसाचे  पाणी ओसरले तरी देखील या ठिकाणी पाणी साचलेले राहत आहेत वेळेवर सफाई केली जात नाही .त्यामुले ओलावा राहून मच्छरांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहक हि मग या ठिकाणी मालाची खरेदी करायला येत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुले व्यापाऱ्यांना मात्र नुकसान सहन करावा लागत आहे.
त्याच प्रमाणे ओली झालेली फळे व्यापाऱ्यांना पंखे कुलर लावून सुकवावी लागत आहेत. जेणेकरून मालाचे नुकसान होऊ नये . ओपन शेड मधील या व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या  वतीने नवीन सुविधा इमारती मध्ये  तळघरात व्यापाऱ्यांसाठी जागा देऊ केली आहे. या जागेला व्यापार्यांचा विरोध आहे. तळघरात घाऊक व्यापाऱ्याला जागा दिल्यास या ठिकाणी मालाची ने आन करणे फारच त्रास दायक होणार आहे. त्यामुळे कोणताही व्यापारी तळ मजल्यावर जाऊन मालाची खरेदी करायला जाणार नाही . परिणामी व्यापाऱ्यांचं मुलासह नुकसान होईल आणि व्यापार बुडेल त्यामुले आम्हाला वरच्या मजल्यावर व्यापार करायला जागा द्या अशी मागणी या व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे लावून धरली आहे. त्यावर बाजार समिती काय निर्णय घेतेय याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. मात्र त्या अगोदर या पावसातील समस्या बाजार समितीने सोडवावयात अशी मागणी आजचाय  बैठकीत व्यापाऱ्यांनी केली आहे.
बाजार समितीच्या आत व्यापार करायला ,गाळाधारक प्रमाणे आम्ही ओपेनशेड मधील व्यापारी हि बाजार समितीला शुल्क भरतो त्यामुळे आम्हाला प्राथमिक सोइ सुविधा पुरवणे बाजार समितीचे काम आहे. मात्र आम्हाला कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत त्यामुळे आम्हाला व्यापार करणे कठीण झाले आहे. पावसामुळॆ मालाचे प्रचंड नुकसान होत आहे .ओपन शेड फ्रुट मर्चंट वेलफेयर असोशिएशन – रामबशिष्ट जैस्वाल
Share: