मुंबई Apmc फळ मार्केटमध्ये १५० रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा सफरचंद ६० ते ७० रुपये किलो

21
0
Share:

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये आज एकूण ३५० गाड्यांची आवक झाली आहे. सफरचंदाचे दर उतरल्याचे दिसून येत आहेत. अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत. त्यामुळे फळांच्या किंमतींनी सणासुदीच्या काळात आसमान गाठले होते. मात्र आता फळांच्या किंमतीत घसरण झाली आहे.

आज फळ बाजारात सफरचंदाची ११ हजार क्विंटल आवक झाली असून सफरचंदाच्या किंमतीत घसरण झाली आहे. १५० रुपये किलो दराने विकला जाणारा सफरचंद सध्या बाजारात ६० ते ७० रुपये दराने विकला जात आहे. तर सीताफळची आवक एक हजार क्विंटल झाली असून सीताफळ १० ते ३० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. तसेच डाळिंबाची आवक १०८०क्विंटल झाली असून ३५ रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. मार्केटमध्ये २१०० संत्रींची आवक झाली आहे. संत्रीच्या भावातीत घसरण झाली असून ३० रुपये प्रतिकिलोने बाजारात विकली जात आहे.

हिमाचल, काश्मीर, शिमला, कुनुर या ठिकाणांहून सफरचंदाची मोठी आवक फळ मार्केटमध्ये होऊनदेखील सफरचंदाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांनादेखील सफरचंदाची चव घेऊ शकतो. मात्र किरकोळ बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने फळांचे भाव वाढून ते विकले जात आहेत. त्यामुळे दरवाढीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागणार आहे.

Share: