नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली म्हणून, कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल – रोहित पवार याचा ईडी वर निशाण

Share:

नवी मुंबई : रोहित पवार यांनी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे.

मात्र, राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, असे आश्वासन रोहित पवार यांनी दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली. यावेळी कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल. ईडीच्या माध्यमातून भाजपाकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे, असे महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबाबत रोहित पवार म्हणाले.
याशिवाय, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच, महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले की, “उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे.”

 

Share: