नांदेडमधून अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर.

22
0
Share:

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक-एक जागा महत्वाची आहे. त्यामुळे नांदेड मतदार संघातून विद्यमान खासदार व प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची उमेदवारी शनिवारी रात्री दिल्लीतून जाहीर करण्यात आली. देशात 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण विक्रमी मतांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. मात्र यावेळी त्यांनी पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस उमेदवारीसाठी केली होती. चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात असतील तर त्याचा चांगला परिणाम आजूबाजूच्या मतदार संघातही होऊन काँग्रेस आघाडीला फायदा होऊ शकतो. त्यामुळे अशोक चव्हाण यांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले असून त्यांचा सामना भाजप उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्याशी होणार आहे.

Share: