मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सभापती पदासाठी अशोक डक तर उपसभापती धनंजय वाडकर यांच्या नावाची मोहर लागल्याने ; कही खुशी कही गम

51
0
Share:

दिपाली बोडबे-एपीएमसी न्युज

नवी मुंबई: मुंबई कृषी उपन्न बाजार समिती सभापती पदासाठी अशोक डक यांची निवड तर उपसभापती पदासाठी धनंजय वाडकर यांची निवड झाली आहे.मराठावाडा महसूल विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक गोविंदराव डक यांना विनविरोध सभापती पदासाठी निवडून देण्यात आले आहे. तर पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांना मुंबई एपीमसीच्या उपसभापती पदासाठी विनविरोध निवडून देण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 5 महिने लांबणीवर पडली होती. अखेर या निवडणुकीसाठी मुहूर्त सापडला असून आज सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी ही निवडणूक पार पडली.कोणाच्या डोक्यावर असेल बाजारसमितीच्या सभापतीचा मुकुट असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच झाली होती.निवडणुकीसाठी आजचा शुभमुहूर्त ठरला होता.पुणे विभागाचे बाळासाहेब सोळसकर आणि नागपूर विभागाचे सुधीर कोठारी यांची जोरदार चर्चा सुरू होती.दोघांच्याही चेहऱ्यावर सभासद बनण्याची उत्सुकता दिसून येत होती.

बाजारसमितीमधील प्रवीण देशमुख, माधवराव जाधव,प्रभू पाटील,बाळासाहेब सोलसकर, धनंजय वाडकर,हुकूमचंद आमधरे,सुधीर कोठारी,जयदत्त होळकर, अद्वैत हिरे,वैजनाथ शिंदे, अशोक डक, अशोक वाळुंज,शंकर पिंगळे,निलेश वीरा, विजय भुता,शशिकांत शिंदे, संजय पानसरे असे 18 सदस्य सभापती व उपसभापती पदासाठी मतदान झाले होते.

Share: