आत्ता मोबाईलवर कळणार एसटीचे निश्चित स्थान चक्क लालपरी डिजिटल झाली.

23
0
Share:

३५ कोटींची तरतूद : एसटी बसेस येणार ‘जीपीएस’च्या नियंत्रणाखाली.
आॅनलाइन अ‍ॅग्रीगेटर्सप्रमाणे एसटी महामंडळातील बसेसही आता ‘जीपीएस’च्या नियंत्रणाखाली येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटी स्थानकांवर लावलेल्या डिजिटल बोर्डवर एसटीची निश्चित वेळ समजू शकेल. तर मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना एसटीच्या निश्चित ठिकाणाची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी महामंडळाने सुमारे ३५ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंग देओल यांनी दिली.
जीपीएस यंत्रणेमुळे असे होणार फायदे
च्या यंत्रणेत सर्व स्थानकांवर डिजिटल फलक लावले जातील. याद्वारे प्रवाशांना एसटीची वेळ पाहता येईल.
च्जीपीएस यंत्रणेमुळे एसटी चालकाने एखादा स्टॉप चुकवला तर त्याचीही माहिती प्रशासनाला कळेल.

च्मोबाइलवर ग्राहकांना एसटी बसचे निश्चित ठिकाण समजेल.

च्स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना किती वेळात एसटी येणार, याची माहिती मिळेल.

च्वाहन चालक किती वेगाने एसटी चालवित आहे, याचीही माहिती जीपीएसमुळे समजणार आहे.

Share: