सभापती आणि उपसभापती यांच्या पाहणी दौऱ्यात मार्केटच्या स्वच्छता अधिकारी व अभियंत्यांचा घाण लपवण्याचा प्रयत्न

24
0
Share:

सभापती आणि उपसभापती यांच्या पाहणी दौऱ्यात मार्केटच्या स्वच्छता अधिकारी व अभियंत्यांचा घाण लपवण्याचा प्रयत्न

– कांदा बटाटा मार्केटला टेकू लावणाऱ्या मार्केट अभियंत्याचा सत्कार

घाण लपवण्यासाठी गटारावर लोखंडाची बॅरिकेट

नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कांदा बटाटा मार्केट 2003 साली नवी मुंबई महापालिकेने धोकादायक घोषीत केले आहे. या अतीधोकादायक गळ्यावर व्यापारी आपल्या जीवाशी खेळून व्यापार करत आहेत. तसेच माथाडी कामगार, ग्राहक, वाहतूकदार हजारोंच्या संख्येने मार्केटमध्ये ये-जा करतात. या बाजार आवारात ड्रेनेज लाईन चॉकअप झाल्याने ठीक ठिकाणी पाणी साचून बाजार आवारात दुर्गंधी पसरली आहे. गाळ्यावरील आणि धक्यावरील स्लॅब कोसळल्याने काही कामगार जखमी देखील झाले.

मार्केटमध्ये काही नेते मंडळी कित्येकवेळा बाजार समितीला भेट देण्यासाठी आले आणि फक्त फोटो काढून गेले. पण मार्केटच्या सर्व मुद्यावर दुर्लक्ष केले. मार्केट स्वतःच्या अवस्थेला कंटाळून रडत आहे. आज पण तेच पाहायला मिळाले ज्यावेळी भाजीपाला आणि कांदा बटाटा मार्केटमध्ये सकाळपासून सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी पाहणी दौरा केला. काही जणांनी स्वतःचे वर्चस्व दाखवण्यासाठी विविध ठिकाणी गळ्यामध्ये फोटो सेशन केले.

सभापती आणि उपसभापती पाहणी दौऱ्यासाठी मार्केटमध्ये गेले त्यावेळी कांदा बटाटा व भाजीपाला पॅसेज मध्ये अनधिकृतपणे माल ठेवण्यात आला होता. ज्यामुळे सभापती आणि उपसभापती यांना मार्केटमध्ये जाण्यास अडथळा निर्माण झाला.

या पाहणी दौऱ्यानंतर व्यापाऱ्यांनी असे सांगितले की, आमच्याकडून एपीएमसी प्रशासनाने 17 वर्षांपासून लाखो रुपये बाजार फी वसुली केली. पण बाजार समितीकडून कोणत्याही सुविधा पुरवल्या गेल्या नाही. आणि धोकादायक इमारत अशी कारण सांगून कित्येक वर्ष आमचा पैसा आमच्या मार्केटसाठी वापरला गेला नाही. मार्केटमध्ये ड्रेनेज लाईन चॉकअप आहे, पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही, स्लॅब कोसळतो, शौचालय साफ नाही, मार्केट टेकूच्या सहाय्याने उभे आहे.


तसेच नियमनमुक्तीमुळे मार्केटची आवक 50 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली जास्त करून माल डायरेक्ट मुंबईला विकला जातो. याचा त्रास शेतकरी व्यापारी यांना सहन करावा लागत आहे. 2003 मध्ये कांदा बटाटा मार्केट धोकादायक घोषीत करण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत बाजार समिती असमर्थ राहिली आहे. या सर्व समस्या व्यापाऱ्यांनी सभापती व उपसभापती यांच्यासमोर मांडल्या.

कांदा बटाटा अडत व्यापारी संघातर्फे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक अशोक वाळुंज, एपीएमसी अतिरीक्त सचिव, मुख्य सुरक्षा अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या सत्कार लिस्टमध्ये स्वछता अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि मार्केट अभियंता याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती आणि उपसभापती यांनी व्यापाऱ्यांना असे आश्वासन दिले की, लवकरच मार्केटमधील सर्व प्रश्न बोर्ड कमिटी मिटींग मध्ये मार्गी लावू.

Share: