Apmc News:धुळे एसटी बस कंटेनरमध्ये भीषण अपघात , 15 प्रवाशांचा मृत्यू,19जखमी

5
0
Share:

धुळे:औरंगाबाद-शहादा एसटी बसला भीषण अपघात झाला असून यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी आहेत. धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळील सब स्टेशनजवळ रात्री हा अपघात झाला. कंटेनरची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

कंटेनरच्या धडकेत बस कापली गेल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बसचालक आणि कंटेनर चालकाचाही समावेश आहे. सर्व मृत प्रवासी शहादा तालुका आणि शहरातील रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच जवळपास असलेल्या लोकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

 

जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचा मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी रिक्षा, कार, रुग्णवाहिका मिळेल ते वाहन अपघातस्थळी घेऊन गेले आहे.

सर्व जखमी प्रवाशांवर शहादा, दोंडाईचा, धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस आणि कंटेनर बाजूला करण्यात आला आहे.

Share: