औसा – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर जीप टँकरचा अपघात, दोन ठार

7
0
Share:

औसा व तुळजापूर दरम्यान असलेल्या बेलकुंड व टाका पाटी दरम्यान जीप आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये जीप मधील दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर अन्य पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारांसाठी औसा व लातूरला पाठविण्यात आले आहे. तर अपघातातील दोन्ही मृतांना बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले असून, नातेवाईक आल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एम पी ३९ – १८६३ हा दिलीप बिल्डकाँन च्या कामावर आसलेला टँकर उजनी कडून बेलकुंडकडे येत होता, तर एम एच २४ सी ६४५७ ही जीप औशाकडून उजनीकडे जात होती. या दोन वाहनांमध्ये समोरा – समोर धडक झाली. यामध्ये जीपमध्ये आसलेले विवेक शिर्के व अरुण कायंदे हे दोघे जागीच ठार झाले. हे दोघे सातारा जिल्ह्यातील शेंद्री येथील असून सध्या मुंबईत राहत असल्याचे समजते.

Share: