मुंबई कृषी उत्पन बाजार समिति घोटाळ्याची पार्श्वभूमी,ठाकरे सरकार घोटाळ्यातील दोषींवर कारवाई कधी करणार..

6
0
Share:

ठाकरे सरकार मुंबई एपीएमसी घोटाळ्यातील दोषींवर कारवाई कधी होणार..

-मुंबई कृषी उत्पन बाजार समितिची घोटाळ्याची पार्श्वभूमी

-फर्जी अनुभव सर्टिफिकेटच्या आधारे मोठ्या पदावर वसलेल्या बोगस अभियंता.

-बाजारसमितीच्या कोटींच्या गुंतवणूकीचा बँकेकडूनच अपहार , व्याज तर सोडा मुद्दलीलाही मुकली बाजारसमिती,समिती व बँकेच्या अधिकाऱ्यांचा आर्थिक घोटाळ्यात समावेश.

नवी मुंबई:राज्य सरकारने महत्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कँडी क्रँश गेम ओपन होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी होत होत्या. त्यासंदर्भात राज्य सरकारनं कारवाई करत सहकार आयुक्त यांना जबाबदार धरत सतीश सोनी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या लिंकमधील तांत्रिक त्रुटीही दूर करण्यात आल्या आहेत.सहकार आयुक्त व मुंबई एपीएमसी प्रशासक पदावर असताना सोनी यांनी बरेच वेळ मुंबई एपीएमसी कडे लक्षय दिले होते,महाविकास आघाडी सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या कुठल्याही धोरणवर लक्षय नव्हते ज्यामुळे सतीश सोनियांना निलंबित करणयात आली आहे अशे चर्चा सध्या बाजारात सुरू आहे.
तीन वर्षांपासून सतीश सोनी यांच्याकडे अपर आयुक्त व
सहकार खाते व बाजार समिती पद होते या पदावर असताना बाजार समितीमध्ये या शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारची मोठी धोरण केली नाही जे काम झाली ते पुढील प्रमाणे..
-शेतकऱ्यांची अडवणूक,फसवणूक आणि गैरव्यवहाराची बाबतीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कुप्रसिद्ध आहे.वाशी मध्ये सुमारे दोनशे एकरांवर बाजार समितीचा विस्तार आहे,समितीमध्ये भाजीपाला,फळे,कांदा-बटाटा,धान्य आणि मसाले अशी पाच मार्केट आहेत,समितीची वार्षिक उलाढाल सुमारे 10 हजार कोटी पेक्षा जास्त आहे.या उलढालीतून वर्षाला सुमारे 114 कोटीचे उत्पन्न समितीला मिळत होते, 2014 पासून समितीवर प्रशासक आहे.बाजार समितीमध्ये संचालक मंडळाच्या ताब्यात असताना बाजार समितीमधील FSI गैरव्यवहारचे प्रकरण चांगलेच गाजले होते.हे 126 कोटीच्या गैरव्यवहाराची प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे ज्यामुळे संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल आहे. या एफ एस आय वर शासनाने सन 2016 ते 2017 दरम्यान एक सदस्य चोकशी कमिटी केली होती त्याचे सदस्य मनोज सोनिक होते. त्यानी चोकशी नंतर शासनास रिपोर्टसादर केला व त्यात रेडी रेकनर दर प्रती चौ फूट 2000 रुपये दराप्रमाणे गळ्याधारका कडून वसूल करण्यात आदेश दिले होते. एपी एम सी ने फक्त एका वेळीच गाळे धारकना नोटिस दिलेल्या त्यांनतर हेतू पुरस्कर कोर्टात सुध्दा पाठपुरावा केलेला नाही
समितीचा प्रशासक म्हणून सतीश सोनी यांना 15 मार्च 2017 साली रुजू झाली .त्यावेळा पासून बाजार समिती मध्ये कुठला प्रकारचे चांगले काम झाली नाही अशी माहिती आरटीआय ऍक्टिव्हिस्ट अनर्जीत चव्हाण यांनी दिली आहे.

फर्जी अनुभव सर्टिफिकेटच्या आधारे मोठ्या पदावर वसलेल्या बोगस अभियंता.

भर्ती कायद्याच्या उल्लंघन करून फर्जी अनुभवपत्र आणि फर्जी दस्ताएवज वरुन जूनियर अभियंता या पदावर करण्यात आलेली नियुक्ति घोटालेच्या भंडाफोड़ झाला . ज्यामुळे यावर बाजार समितीने चौकशी कमिटी सुभाष पाटील यांच्या अधिपत्या खाली नेमली व चौकशी अधिकारी म्हणून् रिपोर्ट बाजारसमितीला दिले होते त्या मध्ये चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेली ही भर्ती व नियुक्तिमुळे लाभान्वित झालेले एपीएमसीचे अधीक्षक अभियंता विलास बिरादार, उप अभियंता मेहबूब बेपारी,कार्यकारी अभियंता रमेश खिस्ते, कानिष्ठ अभियंता सतीश देशमुख चौघे अभियंताना निलंबित करणे आणि त्यांना दिलेल्या करोडो रूपयांचे पगार आणि भत्ते परत वसूल करण्याची मागणी वरुन एपीएमसी बाजार समितित खलबल माजली होती.परंतु या चौघे मधून चौकशी झाल्या नतर ही कार्यकारी अभियंता रमेश खिस्ते यांनी आपली बदली msrdc मध्ये करून घेतली तसेच उपअभियंता मेहबूब बेपारी हे सॉफ़्ट वेअर अभियंता नसताना त्यांना अजून अतिरिक्त पद उप सचिव माहिती तंत्रज्ञान असे पद गेल्या आठ महिन्यापासून देण्यात आले आहे ,तंत्रज्ञानची काही माहिती नसताना एक अभियंतला अतिरिक्त पद देण्यात आली या मध्ये जुना सॉफ़्ट वेअर चा चुकीचा वापर करुन भ्रष्ट्राचार करण्याचा हेतू दिसून येत आहे . खोटे कागदपत्र दाखल करून भर्ती कायद्याचे उल्लंघन करून फर्जी अनुभवपत्र आणि फर्जी दस्ताएवज वरुन कनिष्ठ अभियंता या पदावर करण्यात आलेली नियुक्तिमुळे लाभान्वित झालेले एपीएमसीचे उप अभियंता मेहबूब बेपारिवर वाशी न्यायालयात संतोष यादव यांनी पुरावे आणि माहिती सादर केली होती त्या अनश्ंगाने न्यायालयाने मेहबूब बेपारी यांच्यावर या कलमा अंतर्गत 420,467,468 गुन्हा केल्याची स्पष्ट होते, न्यायालयाने एपीएमसी पोलीस ठाण्यात पूर्ण तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी आदेश दिले आहे सध्या चौकशी सुरू असताना बेपारी दोन पदावर काम करत आहेत ,शासनाच्या GR प्रमाणे न्यायालयातून आलेल्या चौकशी प्रमाणे बेपारीला निलंबित केला पाहीचे पण बाजार समितीचे प्रशासनाने मेहबूब बेपारीला दोन पद दिली आहे.त्याच बरोबर अधीक्षक अभियंता विलास बिरादार व कनिष्ठ अभियंता सतीश देशमुख यांच्या कामगिरी सध्या पूर्ण मार्केट मध्ये चर्चेत विषय बनला आहे .मसाला मार्केट व दाना मार्केट मध्ये काँक्रीटीकरण, डांबरीकरण व गटारांची 19 कोटीच्या काम सुरू आहे अधीक्षक अभियंता व मार्केट अभियंता सतीश देशमुखाच्या आशीर्वादाने कंत्राटदार यांनी दाना मार्केट मध्ये काँक्रिटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आली आहे.

बाजारसमितीच्या कोटींच्या गुंतवणूकीचा बँकेकडूनच अपहार , व्याज तर सोडा मुद्दलीलाही मुकली बाजारसमिती,समिती व बँकेच्या अधिकाऱ्यांचा आर्थिक घोटाळ्यात समावेश.

-मुंबई कृषीउत्पन्न बाजार समितीने मे २०१४ साली ६५ कोटीची रक्कम मुदत ठेवीवर गुंतवणूक करण्यासाज प्रस्ताव मंजूर केला होता. हा प्रस्ताव तत्कालीन सभापती बाळासाहेब सोळसकर,सचिव सुधीर तुंगार,मुख्य लेखाधिकारी मंदार साळवी यांच्या मंजुरीने संमत झाला होता. ६५ कोटीची मुदत ठेव बाजारसमितीने मलबार हिल येथील दैना बँकेच्या शाखेत जमा केली. या ६५ कोटी रुपयांची मुदत ठेव रक्कमेची प्रमाणपत्रे तत्कालीन समितीचे मुख्यलेखाधिकारी मंदार साळवे यांनी प्राप्त केली होती.बाजारसमितीच्या आसपास च्या परिसरात २० पेक्षा अधिक राष्ट्रीयकृत बँका असताना मलबार हिल येथील बँकेतच का ही मुदत ठेव करण्यात आली सध्या 100 कोटी पोहोचले आहे .
-फळ मार्केट मध्ये 6 वर्षांपासून बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारत सध्या चर्चे मध्ये आहे ही इमारत 2016 ला ताब्यात देण्यात होते आता पर्यंत व्यापाराला मिळाली नाही पाच बेला तोडफोड करून 21 कोटी रुपयेच्या काम सध्या 45 कोटी पर्यंत पोहोचले आहे या मागे भ्रष्टाचार दिसून येत आहे, सध्या सहकार आयुक्त सतीश सोनी याना निलंबित करण्यात आली आहे त्याच बरोबर बाजार समिती मध्ये असलेल्या अधिकारावर कारवाई का होत नाही असे प्रश्न व्यापारी,माथाडी कामगार व मापडी करत आहेत, ठाकरे सरकार या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का बाजारातील व्यापारी वर्तुळात चर्चा आहे.

Share: