सीताफळ खाताय तर सावधान!

73
0
Share:
नवी मुंबई: मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये आज एकूण ३५० गाड्यांची आवक झाली आहे. फळांचे दर उतरल्याचे दिसून येत आहेत. अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत. त्यामुळे फळांच्या किंमतींनी सणासुदीच्या काळात आसमान गाठले होते. मात्र आता फळांच्या किंमतीत घसरण झाली आहे. परंतु परतीच्या पावसाने काही फळ पिकांचे एवढे नुकसान झाले आहे की, त्या फळांमध्ये किडे निघण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई एपेमसी फळ मार्केटमध्ये आज सीताफळची आवक एक हजार क्विंटल झाली आहे. सोलापूर, अकोला, नगर, शिरूर या ठिकाणांहून सीताफळाची आवक झाली आहे. तसेच सध्या फळ बाजारात हनुमान, गोल्डन, सुपर गोल्डन, काटेरी बाळापुरी, महानगरी अशा वेगेळ्यावेगळ्या प्रकारच्या सीताफळाची विक्री केली जात आहे. मात्र एपीएमसी फळ मार्केटमध्ये सीताफळामध्ये किडे असल्याची घटना समोर आली आहे. गोल्डन सीताफळ या प्रकारच्या सीताफळामध्ये किडे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सीताफळाचे दर हे घसरले असून सध्या मार्केटमध्ये सीताफळ हे १० ते ३० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत.
सीताफळाच्या पिकाला पिकवण्यासाठी पाणी कमी प्रमाणात वापरले जाते. मात्र परतीच्या पावसाने सीताफळाच्या पिकाला चांगलाच झोडपून काढलं आहे. योग्य वेळी योग्य ती काळजी न घेत पिकांवर कीटकनाशकांची फवारणी काहीजण करत नाहीत परिणामी फळांमध्ये काही काळाने किडे पडण्यास सुरुवात होते. महत्वाचे म्हणजे गोल्डन सीताफळामध्ये किडे पाडण्याचे प्रकार जास्त आहेत असे एपीएमसीमधील फळ व्यापारी नितीन चस्कर यांनी सांगितले आहे.
Share: